Home > रिपोर्ट > उमेदवारी नसताना पक्षाची पाठराखण करणाऱ्या पक्षनिष्ठ महिला

उमेदवारी नसताना पक्षाची पाठराखण करणाऱ्या पक्षनिष्ठ महिला

उमेदवारी नसताना पक्षाची पाठराखण करणाऱ्या पक्षनिष्ठ महिला
X

राजकारणात नेत्यांना आपल्याच पक्षातून उमेदवारी मिळाली नाही की, पक्ष नेते बंडखोरीवर उतरतात. परंतू असं असताना पक्षासाठी झटून काम करणाऱ्या महिलांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. पाहुयात अशाच काही महिला नेत्यांविषयी माहिती..

रुपाली चाकणकर

courtesy : social media

चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद रुपाली चाकणकर यांच्या हाती आलं. परंतू त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. यावर रूपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त न करता कंबर कसून पक्षाचा प्रचार केला. फक्त प्रचार करुन त्या शांत बसल्या नाहीत. तर, विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकांना देखील चोख प्रत्युत्तर दिलं. रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसली तरी, त्यांनी पक्षासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.

भाजपमध्ये गेलात म्हणून त्यांचा उदोउदो करू नका – रूपाली चाकणकर

रूपाली चाकणकर यांचे संजय काकडेंना प्रत्युत्तर

मेधा कुलकर्णी

कोथरुडच्या सलग दोनदा आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांना यंदा विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, कुलकर्णी यांनी आपले दु:ख बाजूला ठेवून चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराचा पुढाकार घेतला. गावोगावी जाऊन अनेक लोकांची भेट घेत विशेष म्हणजे ब्राह्मण समजाला भेटून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

नाराज मेधा कुलकर्णी करतील का चंद्रकांत पाटील यांचा प्रचार?

अखेर चंद्रकांतदादांना ‘ती’ ने मदत केलीच

रुपाली ठोंबरे पाटील

courtesy : social media

रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जातात. कसबा मतदार संघातून ‘पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा’ रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे नाराज रुपाली पाटील यांनी थेट मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ठाकरेंचा निरोप न आल्यानं रूपाली पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं.

परंतू ठाकरे यांनी काढलेल्या समजूतीनंतर रूपाली पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय बदलला आणि पक्षप्रचारात सामिल झाल्या.

रुपाली ठोंबरे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खडसून टीका

संगिता ठोंबरे

courtesy : social media

राष्ट्रवादीच्या नमीता मुदंडा यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने मुदंडा यांना केज मधून उमेदवारी दिली. यामुळे भाजपच्या संगिता ठोंबरे यांचा पत्ता कट झाला. याविषयी ठोंबरे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र, ठोंबरे यांनी नाराजांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

ठोंबरे म्हणाल्या की, “पंकजा मुंडे यांना अडचणीमुळे आपल्याबाबत कटू निर्णय घ्यावा लागला असावा. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा मी सन्मान करते, कार्यकर्त्यांनी देखील त्यांचा आदर करावा. अशा पद्धतीने ठोंबरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि भाजपला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.

राजकारणात कोणाच्या अश्रूंची होणार फुले…?

- पल्लवी कृष्णा पाटील

Updated : 23 Oct 2019 8:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top