Home > रिपोर्ट > ‘तिकड’चं सगळं मला माहित आहे - चित्रा वाघ

‘तिकड’चं सगळं मला माहित आहे - चित्रा वाघ

‘तिकड’चं सगळं मला माहित आहे - चित्रा वाघ
X

कर्जत जामखेड मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण या ठिकाणाहून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे (Ram Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) निवडणुकीच्या मैदानात आहेत.

त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार यात वाद नाही. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील प्रयत्नशील आहेत.

आता राम शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या चित्रा वाघ य़ा देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी राम शिंदे यांना पाठबळ म्हणून महिला मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीवर (NCP) सडकून टीका केली आहे.

“लंकेत सोन्याच्या विटा आहेत पण त्या विटा तुमच्या काय कामाच्या? आता रामराज्य पाहिजे. माझा भाऊ विकासकामे करून मतं मागतोय. विरोधकांनी काय काम केलंय?”

असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

“मी 20 वर्ष तिकडे (राष्ट्रवादीत) होते. त्यामुळे तिकडचं मला सगळं माहित आहे. आपल्याच माणसाला आपली सुख-दु:ख कळतात. विरोधकांच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता राम शिंदेंच्या कामांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांना विजयी करा.”

असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केलं आहे.

Updated : 11 Oct 2019 11:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top