Home > रिपोर्ट > मुंडे Vs मुंडे काय होणार ?

मुंडे Vs मुंडे काय होणार ?

मुंडे Vs मुंडे काय होणार ?
X

अगामी विधानसभा काही महिन्यांवर असताना महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलंय. सर्वांचेच या विधानसभेच्या लढतीकडे लक्ष लागलं आहे. बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातही अशीच चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या भाऊ-बहिणीतील लढत यंदाही चुरशीची होणार आहे. दोघांनीही आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याआधी २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या होत्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नव्याने डावपेच आखले आहेत.धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी प्रचाराची धुरा आपल्या हाती घेऊन त्यांनी 'डोअर टू डोअर' संवाद यात्रा सुरू केली आहे.दरम्यान, परळी मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार यावर सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

Updated : 3 Aug 2019 9:08 AM GMT
Next Story
Share it
Top