Home > रिपोर्ट > पदभार स्विकारण्याआधी बैलगाडीची सवारी

पदभार स्विकारण्याआधी बैलगाडीची सवारी

पदभार स्विकारण्याआधी बैलगाडीची सवारी
X

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मनीषा पवार यांनी बैलगाडी मधून जिल्हा परिषद आवारात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले होते.मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर आज बुलडाणा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनिषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला तर शिवसेनेच्या कमल बुधवत यांनी उपाध्यक्ष पदाचा पदभार एक दिवस आधीच स्वीकारला आहे. जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून बैलगाडीतून जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांसह रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर पदभार स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्षा मनिषा पवार यांनी सांगितले.

https://youtu.be/oEXc2ygksFg

-निखिल शाह, बुलडाणा

Updated : 15 Jan 2020 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top