Home > रिपोर्ट > माधुरी मिसाळ विरूद्ध अश्विनी कदम; पर्वती मतदारसंघात कोण मारणार बाजी?

माधुरी मिसाळ विरूद्ध अश्विनी कदम; पर्वती मतदारसंघात कोण मारणार बाजी?

माधुरी मिसाळ विरूद्ध अश्विनी कदम; पर्वती मतदारसंघात कोण मारणार बाजी?
X

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पर्वती मतदारसंघात आघाडीकडून कोणाचा उमेदवार असेल हे कोडं उलगडलं आहे. स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष बनल्यापासूनच अश्विनी यांनी आमदारकीसाठी तयारी सुरु केली होती.

त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचं आव्हान आहे. भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर विश्वास टाकला आहे. मिसाळ या शहराध्यक्ष असल्याने त्यांना बाकी मतदारसंघांकडे लक्ष द्यावे लागतं. तरीही त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात प्रचारासाठी योजना आखल्या आहेत.

पर्वती मतदारसंघात मराठा, माळी, दलित, जैन मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर पक्षांनी आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. या मतदारसंघात दोन बड्या महिला नेता माधुरी मिसाळ विरूद्ध अश्विनी कदम अशीच मुख्य लढत होणार आहे.

Updated : 4 Oct 2019 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top