Home > रिपोर्ट > उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांनी केली महिला उमेदवारांची बोळवण

उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांनी केली महिला उमेदवारांची बोळवण

उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांनी केली महिला उमेदवारांची बोळवण
X

देशातील सर्व राजकीय पक्ष अर्धी लोकसंख्येचे सक्षमीकरण करण्याबाबत चर्चा आणि दावे करतात, परंतु महिलांना तिकीट देण्याबद्दल कचरताहेत. एकदंरीत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही असाच कल दिसून आला आहे. आतापर्यंत सर्व पक्षांनी सुमारे तीन चतुर्थांश उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, राजकीय पक्षांकडून महिलांना ३३ टक्के उमेदवारी देणं हे अजूनही दिवास्वप्नच आहे.

कॉंग्रेसने १० महिला उमेदवाराद्वारे आजमावणार नशिब

उत्तर प्रदेशातील महिला उमेदवारांच्या तिकिटाच्या बाबतीत काँग्रेस सर्वात पुढे आहे. क़ॉंग्रेसने उत्तर प्रदेशात महिलांना १८ टक्के उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 55 उमेदवार घोषित केले आहेत. यापैकी 10 महिला उमेदवार असल्याने काँग्रेसने 18 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी ह्या काँग्रेसच्या सर्वात मोठया महिला उमेदवार आहेत. कॉंग्रेसने त्यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे दुसरीकडे गाझियाबादमधील डॉली शर्मा, नागिना येथून ओमती देवी जाटव, आगरा येथून प्रीती हरित, मिश्रीख येथून मंजरी राहती, उन्नाव येथून अन्नू टंडन, सीतापूरमधील कैसार, बहिराईच येथील सावित्री बाई फुले, प्रतापगढमध्ये रत्ना सिंह आणि महाराजगंजमध्ये सुप्रिया श्रीनित यांना तिकिट दिले आहे.

भाजपाने दिली ९ महिलांना उमेदवारी

भारतीय जनता पार्टीने ६५ उमेदवारांची नावे जाहीर केली असुन यांत ८ महिलांचा समावेश आहे भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा मथुरा मधुन सिनेमा अभिनेत्री हेमा मालिनी निवडणूक लढवणार आहेत अमेठीत राहुल गांधी यांना टक्कर देण्यासाठी भाजपने स्मृति ईरानी यांना उमेदवारी दिली असुन याशिवाय फतेहपूरमध्ये साध्वी निरंजन ज्योती, बदायूत संघमित्रा मौर्य, इलाहाबादमधील रीता बहुगुणा जोशी, रामपूरमध्ये जया प्रदा, सुल्तानपूरात मेनका गांधी आणि धौरहरा मधुन रेखा वर्मा यांच्यावर मदार ठेवलीय. भाजपने सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघातील उत्तर प्रदेशमध्ये १२ टक्के महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.

बसपाच्या १७ उमेदवारांपैकी ३ महिला

बहुजन समाज पक्षाचे नेतृत्व मायावती करत आहेत, परंतु महिलांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात त्यांचा पक्षही फारसा अनुकूल दिसत नाही. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी बीएसपीने घोषित केलेल्या १७ उमेदवारांमध्ये फक्त तीन महिलांचा समावेश आहे. यावेळी बीएसपीने अकबरपूरमध्ये निशा सचान, मिश्रीखमध्ये नीलु सत्यार्थी आणि आंवलात रूची वीरा यांना उमेदवारी दिलीय. अशाप्रकारे बीएसपीने १७ टक्के महिलांना तिकीट दिलंय. बसपा यावेळी ३८ लोकसभा लढविणार आहेत.

समाजवादी पक्षाने दिली १७ टक्के महिलांना संधी

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनी आपल्या भाषणामध्ये राजकारणात महिलांची भूमिका वाढवण्याविषयीची चर्चा केली. पण मुलायमच्या या चर्चेचा प्रभाव पक्षावर फारसा दिसत नाही. लोकसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक लढविणारे २९ उमेदवार एसपीने जाहीर केले आहेत यात पाच महिला उमेदवार आहेत. अखिलेशने जवळपास १७ टक्के महिला उमेदवार उभे केले आहेत एसपीमधून निवडणूक लढविणा–या महिलांमध्ये कन्नौजमधील डिंपल यादव, केरानातील तबस्सुम हसन, उन्नाव येथून पूजा पाल, लखीमपूर खारीतून पूर्वी वर्मा आणि हरदोईमध्ये उषा वर्मा यांचा समावेश आहे.

मायावती आणि प्रियंका ही राजकारणातील महिलाशक्ती

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत महिला यावेळी जास्त आहेत. बसपाचे अध्यक्षा मायावती आपल्या पक्षासाठी उतरल्या आहेत. त्याच वेळी काँग्रेसने जबाबदारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिली आहे. प्रियांका गांधी वाड्रा यांना पूर्व उत्तर प्रदेशचा आदेश देण्यात आला आहे.

२०१४ मध्ये यूपीत होत्या १२५ महिला उमेदवार

गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात १२५ महिला उमेदवार होत्या, त्यापैकी केवळ १३ महिला संसदेत पोहोचल्या. पक्षांविषयी बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशात भाजपने केवळ 11 महिला उमेदवारांना तिकिट दिले होते. काँग्रेसने ७ महिला उमेदवार , समाजवादी पक्षाने १२ आणि बहुजन समाज पक्षाने ६ महिला उमेदवारांना रिंगणात उतरवले होते.

Updated : 6 May 2019 12:12 PM GMT
Next Story
Share it
Top