Home > रिपोर्ट > सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात... दिग्गजांचं भवितव्य होणार मतदानयंत्रात बंद

सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात... दिग्गजांचं भवितव्य होणार मतदानयंत्रात बंद

सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात... दिग्गजांचं भवितव्य होणार मतदानयंत्रात बंद
X

2019च्या लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात देशातील 6 राज्ये आणि दिल्ली मिळून 59 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचारतंत्र हाताशी घेत सत्तेकडे वाटचाल केली आहे. मात्र 2014 साली भाजपाने या 59 जागांपैकी 45 जागा जिंकल्या होत्या. मात2019च्या लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात देशातील 6 राज्ये आणि दिल्ली मिळून 59 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचारतंत्र हाताशी घेत सत्तेकडे वाटचाल केली आहे. मात्र 2014 साली भाजपाने या 59 जागांपैकी 45 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा या जागा राखणं भाजपासाठी मोठं आव्हान असणार आहे.

यांचं भवितव्य होणार मतदानयंत्रात बंद

या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर, तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. राजधानी दिल्लीत भाजप, आप व काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होत आहे.

Updated : 12 May 2019 4:45 AM GMT
Next Story
Share it
Top