Home > रिपोर्ट > साहित्यिक तसेच आदिवासी समाजसेविका रमणिका गुप्ता यांचं निधन

साहित्यिक तसेच आदिवासी समाजसेविका रमणिका गुप्ता यांचं निधन

साहित्यिक तसेच आदिवासी समाजसेविका रमणिका गुप्ता यांचं निधन
X

आदिवासी समाजसेविका तसेच साहित्यिक रमणिका गुप्ता यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. २२ एप्रिल १९३० मध्ये पंजाब इथं जन्मलेल्या रमणिका गुप्ता यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा आहे.

अनेक आंदोलनांचा चेहरा म्हणुन ओळख असलेल्या रमणिका या साहित्यिकही होत्या. युध्दरत आम आदमी या मासिकाच्या त्या संपादक होत्या. ९० च्या दशकात त्यांनी समाजकार्याला सुरूवात केली. महिला, कामगार, दलित तसेच आदिवासी हे त्यांच्या कामाचे केंद्रबिंदु होते. साहित्य व समाजसेवे बरोबरच बिहार विधानसभा व विधानपरिषदेची निवडणूकही त्यांनी लढवली होती.

Updated : 27 March 2019 12:12 PM GMT
Next Story
Share it
Top