Home > रिपोर्ट > बालपणीचे सेक्स एज्युकेशन

बालपणीचे सेक्स एज्युकेशन

बालपणीचे सेक्स एज्युकेशन
X

बालमनाला हळूवार जपावे लागते. खास करून लैंगिक शिक्षण, भिन्नलिंगी व्यक्तीचा आदर इत्यादीविषयी तयार झालेली मते पुढे प्रौढ वयातही त्रासदायक ठरतात. निर्भया प्रकरणानंतर सेक्स एजुकेशनची गरज किती अपरिहार्य आहे, यावर चर्चा सुरू झाली. पण हे करायचे कसे? याबाबत सर्वच संभ्रमात आहे. शिक्षकांनी मुलांना समजावून सांगावे, अशी पालकांची अपेक्षा, तर काय आणि कसे सांगावे? याविषयी शिक्षकांची द्विधा मनःस्थिती, यामुळे तज्ज्ञांनी मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.

एक अत्यंत उच्च शिक्षित जोडपे समुपदेशकाकडे आले. त्यातील पुरुषाने समुपदेशकाला सांगण्यास सुरवात केली, “पाहा नं डॉक्टर, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. एकमेकांना सांभाळून घेणं, जपणं हे सगळं आम्ही करतो, कधी तक्रार नाही, कशाबद्दलच दोघांचीही ! पाच वर्षं झाली, आम्ही सोबत राहतोय. माझ्या घरचे आता लग्न कर म्हणून मागे लागले आहेत. पण ही आहे की, लग्न करायला तयारच नाही. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. बाकी सगळं करते हो, पण लग्न नको म्हणते.” तो तरुण अगदी रडवेल्या सुरात बोलत होता. समुपदेशकाने आपला मोर्चा त्या तरुणीकडे वळवला. आधुनिक पेहराव करणारी ती तरुणी समुपदेशकांना पटवून सांगत होती की, लग्न न करताही ते दोघे कसं चांगलं आयुष्य जगू शकतात. त्यासाठी लग्न करण्याची आवश्यकताच नाही. उलट लग्न केल्याने काय काय वाईट परिणाम होऊ शकतात, याच्या शक्यतांची लिस्टच ती ऐकवत होती. पुढे तिच्या लहानपणाबद्दल चौकशी केल्यावर समुपदेशकांच्या लक्षात आलं की, ती पाच एक वर्षाची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. तिला आईने वाढवले होते. घटस्फोट होण्याआधी तिच्या आईवडिलांची खूप भांडणं होत आणि ती तिनं पाहिलेली होती. त्यामुळेच लग्नानंतर आपल्या दोघांमध्येही अशीच भांडणे होतील, असा समज तिने करून घेतला होता.

बालपणी मानवर खूप खोल परिणाम करतात गोष्टी. त्याचा परिणाम पुढच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे बालमनाला हळूवार जपावे लागते. खास करून लैंगिक शिक्षण, भिन्नलिंगी व्यक्तीचा आदर इत्यादीविषयी तयार झालेली मते पुढे प्रौढ वयातही त्रासदायक ठरतात. निर्भया प्रकरणानंतर सेक्स एज्युकेशनची गरज किती अपरिहार्य आहे, यावर चर्चा सुरू झाली. पण हे करायचे कसे? याबाबत सर्वच संभ्रमात आहे. शिक्षकांनी मुलांना समजावून सांगावे, अशी पालकांची अपेक्षा, तर काय आणि कसे सांगावे? याविषयी शिक्षकांची द्विधा मनःस्थिती, यामुळे तज्ज्ञांनी मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. कोणा एका व्यक्तीने ही माहिती देऊन उपयोग नाही. वेगवेगळ्या वयातील मुलांना त्यांच्या वयोगटानुसार तसेच वेगळ्या पध्दतीने माहिती देणे गरजेचे आहे. आपल्याकडे केवळ शारीरिक महिती दिली म्हणजे पुरे असा समज आहे; मात्र, सेक्सच्या सर्वच बाबींचा विचार, माहिती या वयात काही गैरसमजुती मनात घर करुन बसतात, ज्या पुढील आयुष्यात घातक ठरू शकतात.

आपल्या सगळ्यात जास्त जवळच्या, हक्काच्या माणसांना 'मला आजकाल असं का होतंय?' हे विचारायचा मोकळेपणा, विश्वास आपल्या किशोरवयीन मुलांच्या मनात निर्माण करणं ही प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचारप्रक्रिया विकसित होत असते, ठाम मतं तयार होत असतात, अन् दुसरीकडे हळूहळू होणारे शारीरिक बदल, जडणघडण गोंधळात टाकत असतात. या अडनिड्या वयात असलेल्या मुलांना आपल्या शरीरात घडणाऱ्या बदलांबाबत थोडीफार माहिती असली, तरी या बदलांना, त्या बद्दलच्या उत्सुकतेला कसं सामोरं जावं, याबाबत बऱ्याचदा खात्री नसते. या काळात काय काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी, मित्रमैत्रिणींमध्ये निर्माण होणाऱ्या आकर्षणाला नक्की कसं हाताळावं? योग्य वेळी योग्य ते प्रश्न विचारणं, चर्चा करणं, मन मोकळं करणं याकरता जे अवकाश लागतं, ते एक पालक म्हणून आपण कसं निर्माण करू शकतो? कसोटीच्या क्षणी मुलांना आपला आधार वाटावा, म्हणून मुलांना मानसिक आणि नैतिक बळ देणारा सुसंवाद कसा साधू शकतो?

जीवनशैली, बदलते संस्कार आणि ते घेऊन आलेल्या बदलत्या समस्या. मुलामुलींचा मोकळेपणा वाढला. जवळीक वाढू लागली आणि त्याबरोबरच लहान वयात लैंगिक आकर्षणही वाढले. पूर्वी मुलं मुलींशी बोलायला लाजायची. काही वाटले तरी मनात; उघड नव्हे ! कारण तेवढा मोकळेपणा नव्हता, मान्यता नव्हती. म्हणूनच सगळे सिमीत होते. पर्यायाने समस्याही कमी होत्या. शारीरिक, मानसिक, लैंगिक जीवन शैलीशी संबंधित व हार्मोन्स बदल,परस्परांतील आकर्षण, शोषण व पिळवणूक, व्यसने, किशोरवयीन लग्न, मुलींची फसवणूक व् गर्भधारणा, टी.व्ही., संगणक, मोबाईल यांचा नेमका वापर व पौगंडावस्थेतील मुला-मुलींशी वागावे कसे ?

अनेक प्रश्न तयार होण्याआधीच आपण थांबवू शकतो; मात्र, त्यासाठी सर्वच अंगाने विचार तसेच सर्वच बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. सेक्स एज्युकेशनसाठी केवळ विद्यार्थांना तयार करुन उपयोग नाही, तर शिक्षक त्याबरोबरच पालक यांनाही माहिती असणं गरजेचं आहे.

National Family Health ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार १५ ते १९ वयोगटातील मुलींपैकी १२% मुली माता आहेत. कारण काय तर सेक्सबद्दल अज्ञान ! या वयोगटातील साधारणतः प्रत्येक सहावी मुलगी माता आहे. याला काही प्रमाणात बालविवाहही जबाबदार आहेत. दोन वेगवेगळ्या सर्वेक्षणानुसार असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत की जवळजवळ अर्ध्या अधिक युवा वर्गाला वाटते की, त्यांना लैंगिक शिक्षणाचे योग्य ज्ञान नाही. बाल लैंगिक शोषण तर आता खूप मोठ्या प्रमाणावर सामोरे येत आहे. या सर्वांवर उपाय करायचा असेल तर सेक्स एज्युकेशनची गरज किती हे न सांगता सहज समजते.

मुलांचे लैंगिक शिक्षण हे बालवयातच सुरु होते. या वयात मुले अजाण असतात, उत्सुक असतात, निरनिराळे प्रश्न त्यांना सातत्याने पडतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचे काम ते करत असतात. मात्र त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजतील अशा भाषेत मिळाली नाहीत, तर ते नाराज होतात आणि त्या प्रश्नाच्या उत्तराची जणू त्यांना ओढच लागते. त्यासाठी काही वेळा ते आपला चौकसपणाही वाढवतात. त्यातूनच मनोगंड व लैंगिक व्यक्तिमत्वाचा अपुरा अथवा विकृत विकास होतो.

लैंगिक शिक्षणाची जबाबदारी जरी शिक्षकाची असली तरी त्याची सुरवात पालकांपासूनच झाली पाहिजे. त्यासाठी पालकांच्याच स्वतःच्या कल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत. पालकांचीच सेक्सबाबत संकुचित वृत्ती असेल, तर त्याचा परिणाम मुलांवरही पडतो. बालवयात मी कुठून आलो? किंवा तो मुलगा, मी मुलगी का? अशा काही मुलभूत शंका पडत असतात. या प्रश्नांना योग्य अशी शास्त्रीय, शरीरशास्त्रीय त्याबरोबरच मानसशास्त्रीय उत्तरे दिली गेली पाहिजेत. आई-बाबांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे, जवळीकतेमुळे बाळाचा जन्म होतो, असे त्याला समजावून सांगितले, तर बाळ होण्यासाठी आई आणि बाबा दोघेही महत्वाचे आहेत, हे त्या बालमनावर ठसवले जाईल.

अंघोळ करताना सतत लैंगिक अवयव घाण आहेत, सारखा सारखा हात त्या जागी लावू नये, अथवा तसे झाले तर मुलांना त्यासाठी शिक्षा करणे यातून लहान मुलांच्या मनात लैंगिक अवयवांविषयी घृणा, तिरस्कार, ते म्हणजे काहीतरी वाईट अशी प्रतिमा तयार होते. त्यातूनच लैंगिकतेची धास्ती व भिती वाटणे सुरु होते. पुढे हीच भीती त्रासदायक धरते. हे बालवयातच टाळता येऊ शकते. अंघोळ घालताना लैंगिक अवयवांची स्वच्छता कशी करायची, हे शिकवले तर हीच सवय पुढे पौगंडावस्थेत उपयोगी ठरते. मुलामुलींमधला फरक हा बालवयातील अतिशय उत्सुकतेचा विषय असतो. हा फरक जर त्यांना समजेल अशा भाषेत जर स्पष्टपणे सांगितला, तर पुढे हा स्पष्टपणा निश्चित उपयोगी पडतो. त्या उलट जर त्यांच्या प्रश्नांना गोरामोरा चेहरा करून उत्तरे दिली, तर हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे, असा समज मुले करून घेतात आणि आपल्या पद्धतीने हा फरक जाणण्याचा प्रयत्न करतात. तो दरवेळी योग्यच असेल, असे नाही.

पालकांतील आपापसातले संबंध जर प्रेमाचे, सलोख्याचे असतील तर मुलाची लैंगिकतेची वाढ निरोगी होते. मात्र विविध लैंगिक मनोगंड व इतर न्यूनगंड याच काळात वाढण्यास सुरवात होते. सात आठ वर्षांनंतर मुलांना वेगळे झोपणे शिकण्याची गरज असते. त्यामुळे म%

Updated : 20 Jan 2020 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top