‘सर्वांसमोर किस करा’ टोळक्यांनी केली या मुलींकडे मागणी!
Max Woman | 8 Jun 2019 8:03 AM GMT
X
X
जगभरात एलजीबीटी LGBT समुदायावर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यांचं संदर्भात एक धक्कादायक घटना लंडनमध्ये घडली."आमच्या मनोरंजनासाठी सर्वांसमोर किस करा", अशी मागणी या मुलींकडे टोळक्याकडून करण्यात आली. समलिंगी मुलींनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करून टोळक्यांनी पळ काढला.
कधी घडली ही घटना?
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ३० मे रोजी ही घटना घडली. पण याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण लगेच समोर आले नाही. गेमोनतने याबाबत फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली तेव्हा सोशल मिडियावर त्यांना धीर देण्यासाठी हजारो हात उभे राहिले. तेव्हा हे प्रकरण बाहेर आले.
काय आहे हे प्रकरण?
विमान कर्मचारी आणि तिच्या गर्लफ्रेंडला बसमध्ये मुलांच्या टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्या मुलांच्या टोळ्यात ४ मुले होती. त्यातील एक स्पॅनिश, तर उर्वरित ब्रिटनचे होते. मेलानिया गेमोनत आणि तिची अमेरिकन गर्लफ्रेंड ख्रिस या दोघी उरुग्वेहून वेस्ट हॅम्पस्टेडला जात असताना हा प्रकार घडला. गेमोनतने याबाबत फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली. त्या दोघी डबल डेकर बसने प्रवास करत होतो. बसमध्ये कुणीही नव्हतं. मागच्या बाजूला मुलांचा गट बसला होता. त्यांच्या मनोरंजनासाठी या मुलींनी किस करावा, अशी मागणी त्यांनी केली, असं गेमोनतने म्हटलंय. या दोघींसोबत या मुलांचे विचित्र पद्धतीने वागणं सुरु केलं. त्यांचे शारीरिक संबंध पाहता यावं यासाठी किस करण्याची मागणी केली. तसेच त्यांना लेस्बियन म्हणून चिडवलं आणि अश्लील भाषेचा वापर केला, असं गेमोनतने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय. शिवाय नकार दिल्यानंतर दोघींसोबतही अश्लील चाळे करण्यात आले, चालू बसमध्ये मारहाण केली, असंही तक्रारीत म्हटलंय. यामध्ये दोघींनाही मोठी दुखापत झाली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा एलजीबीटी LGBT समुदायाचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Updated : 8 Jun 2019 8:03 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire