Home > रिपोर्ट > सक्षणा सलगर यांची गिरीश महाजनांवर घणाघाती टीका

सक्षणा सलगर यांची गिरीश महाजनांवर घणाघाती टीका

सक्षणा सलगर यांची  गिरीश महाजनांवर घणाघाती टीका
X

महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक नागरिक बेघर झाले आहेत. भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना काढलेल्या सेल्फीत हसून दाद दिल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाअध्यक्ष सक्षना सलगर यांनी एका फेसबुक लाईव्ह मध्ये

"थोडंसं या नीच सरकारविषयी अशा व्हिडिओद्वारे सरकारवर टीका केली आहे. सांगली, कोल्हापुरात लोक वाहून गेले आहेत तरीही सरकारला जाग येत नाही असा सवाल त्यांनी केला आहे. माझी संवेदना जिवंत आहे मात्र या असंवेदनशील सरकारला याबद्दल काहीच भावना नाहीत,गिरीश महाजनांना लाज कशी वाटत नाही अनेक लोक घरात अडकून पडले आहेत, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे, सरकारने राष्ट्रीय आपत्ती जाहिर करायला पाहिजे होती मात्र अजूनही केली नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जयवंत पाटीलांच्या मिसेस च काम सॅल्यूट करण्यासारखं आहे सलग ५ दिवस त्यांनी पूरग्रस्त लोकांना डब्बा पाठवला त्यामुळे सरकारचं काम राजा बोले दल हले असं राहणार नाही तर या देशात लोकशाही जिवंत होती ,जिवंत आहे,आणि जिवंत राहणार"

अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://youtu.be/_QCac_YFBoM

Updated : 9 Aug 2019 2:13 PM GMT
Next Story
Share it
Top