Home > रिपोर्ट > दबंग महिला पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे

दबंग महिला पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे

दबंग महिला पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे
X

कोल्हापूर शहर पोलीस उपाध्यक्षा प्रेरणा कट्टे यांनी कोल्हापूर, सांगली, मुंबई तसेच गुजरातचे मटका व्यवसायाचे कनेक्शन उघड करून गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याचा कारनामा केलाय. त्यांच्या या कामगिरीमुळे कट्टे यांचा खुद्द पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला आहे.

यादवनगर येथील मटका अड्ड्यावर सप्टेंबरमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर संशयित सलीम मुल्लावर कारवाई करण्यात आली होती. याचा तपास पोलीस उपाध्यक्षा प्रेरणा कट्टे यांच्याकडे सोपवण्यात आला. आपलं दैनंदिन काम सांभाळून तट्टे यांनी खोल तपास केला आणि एका मागोमाग एकून 42 जणांना ठोस पुराव्यानिशी पकडून त्यांना जेरबंद केलं आहे.

महासंचालकांनी या तपासाबद्दल त्यांच्या पथकाला एक लाख रूपयाचे बक्षिस जाहीर केलं आहे. अवैध धंद्यावर कारवाई करून उल्लेखनिय तपास केल्याबाबत एका महिला पोलीस अधिकाऱ्याला जिल्ह्यातील पहिलंच बक्षिस जाहीर झालं आहे.

Updated : 7 Oct 2019 10:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top