सुजय विखेंच्या आयुष्यातली ‘ती’
X
सुजय विखेंच्या नावाची जोरदार चर्चा महाराष्ट्रातील प्रत्येक घरा-घरात असताना त्यांच्या आयुष्यातली ‘ती’ कोण? आणि काय आहे त्यांची कहाणी जाणून घेणार आहोत. सुजय विखे हे विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव... काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी कमळाचं फुल हातात घेत भाजपात प्रवेश केला. ह्या सर्व घडामोडी घडत असताना सुजय विखेंना खंबीरपणे साथ देणाऱ्या सतत त्यांच्यामागे सावलीसारख्या असणाऱ्या त्यांच्या आयुष्यातली ती म्हणजे त्यांची बायको धनश्री विखे...
धनश्री या मूळच्या औरंगाबादच्या.. तसेच त्यांचे माहेरकडील आडनाव कुंजीर आहे. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक असून घरात पाच काकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे. लग्नापूर्वी बी.सी.एस.आणि नंतर फायनान्समध्ये एमबीए केलेल्या त्या २०१० साली डॉ. सुजय यांच्याशी विवाहबद्ध होऊन विखे पाटील कुटुंबात आल्या. या दांपत्याला अनिशा नावाची मुलगी आहे. स्वभावाने शांत असलेल्या धनश्री सुरुवातीला फारशा ऍक्टिव्ह नव्हत्या. पण काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या सासूबाई आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी सुरु केलेल्या रणरागिणी महिला बचत गटात लक्ष घालण्यास त्यांनी सुरुवात केली. सध्या या गटाच्या त्या अध्यक्षा आहेत. याशिवाय एक शाळाही चालवतात. सुसंवादी, सुसंस्कृत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वहिनी आणि ताई या नावाने परिचित आहे. सुजय यांच्या प्रवेशानंतर त्यांच्यासोबत राहून प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.