मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर
X
मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल ५० वर्षांनी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर शिवसेनेच्या (Shivsena) सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेनेचे ९४, भाजपाचे (BJP) ८३, काँग्रेसचे (Congress) २९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, सपाचे ६, मनसेचा १ आणि एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत. भाजप या निवडणुकीत उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आदीत्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील विजयात किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदर त्या सलग तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत.
२००६ ला त्या महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्ष होत्या. तर सध्या त्या स्थायी समितीच्या सदस्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी सवांद साधताना पदाबरोबर कामाची जबाबदारीही आता वाढली आहे. तसंच, याचा आनंद साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या समस्या सोडवणे हे माझं कर्तव्य समजून मी काम करेन,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.