Home > पर्सनॅलिटी > #KingMaker : रुपाली पाटील ठोंबरे

#KingMaker : रुपाली पाटील ठोंबरे

#KingMaker : रुपाली पाटील ठोंबरे
X

आज आपण जाणून घेणार आहोत एका धाडसी, डॅशिंग किंगमेकर बद्दल. म्हणजेच पुण्यातील माजी नगरसेवीका रूपाली पाटील ठोंबरे यांच्याबद्दल. पेशाने वकील असलेल्या या मनसेच्या डॅशिंग नेत्याची कहानी थोडी हटके आहे. चला तर जाणून घेऊया रूपाली पाटील ठोंबरे यांच्या वैयक्तीक आयुष्य आणि राजकीय प्रवासाबद्दल.

१० ऑक्टोबर १९८१ साली पुण्यातील अड. चंद्रशेखर पाटील आणि नंदा चंद्रशेखर पाटील यांच्या घरी रुपाली पाटील यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील आणि काका दोघंही नामवंत वकील असल्याने या कुटूंबाचा आणि राजकारणाचा दुरदुर पर्यंत काहीही संबंध नव्हता. रूपाली पाटील या राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना त्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत होत्या. त्यामुळे त्यांचा परगावी प्रवास होत असायचा.

इथूनच त्यांच्या आव्हानात्मक वृत्तीला चालना मिळाली. स्पर्धेसाठी दुसऱ्या गावी गेलेल्या मुलींच्या टीमला अनेकदा टवाळ मुलं छेडू पहायची, तेव्हा रूपाली पाटील त्या मुलांना पळवून सर्व मुलींच रक्षण करायच्या यामुळे त्यांच्यात नेतृत्व करण्याची आणि आव्हान पेलण्याची कला अवगत झाली.

२००६ साली अशाच एका स्पर्धेनिमीत्त रूपाली पाटील परगावी गेल्या होत्या. तिथे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच भाषण त्यांनी ऐकलं. या सभेदरम्यान रूपाली यांना वेगळपण जाणवलं. महिलांना गर्दी साठी जमवून साडी हळदी कुंकू देऊन त्यांना घरी पाठवणं हे या पक्षात होत नव्हतं. तर राज ठाकरे महिलांना पुढे येऊन नेतृत्व करण्याची संधी देत होते. त्यांच्या या सभेमुळे त्यांना राजकारणात येण्याचं प्रोत्साहन मिळालं. मग सुरू झाला रूपाली पाटील यांचा राजकीय प्रवास...

घरातून त्यांच्या काही गोष्टींना विरोध होत होता मात्र, रूपाली पाटील या त्यांच्या निश्चयावर ठाम असल्यानं, त्या करत असलेल्या गोष्टी कश्या योग्य असतात हे प्रत्येकवेळी पटवून दिले. त्यामुळे त्यांना सासर आणि माहेर अशा दोन्ही कुटूंबांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. रूपाली पाटील यांनी २००८ मध्ये भारती विद्यापिठात LLB चं शिक्षण घेत असताना, महाविद्यालय मराठी विद्यार्थ्यांकडून अधिक डोनेशन आकारत असल्यामुळे आंदोलन केलं होत. मनसेने परप्रांतियां विरोधात छेडलेल्या आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळेस रूपाली यांना ९ दिवसांसाठी अटक देखील झाली होती. याबाबत घरातून त्यांना खूप बोलणी ऐकून घ्यावी लागली. मात्र, समाजातून त्यांना मानाचे स्थान मिळाले लोकांचे प्रोत्साहन आणि प्रशंसा यामुळे त्यांना समाजसेवा करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाली.

रूपाली पाटील यांच्या समाजसेवा आणि आंदोलनं करण्याच्या वृत्ती मुळे कुटूंबाने त्यांच्या लग्नाची आशा सोडून दिली होती. पण डिसेंबर २००९ मध्ये अड. विजयसिंह ठोंबरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि तेव्हापासून रूपाली पाटील ठोंबरे या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

‘मॅक्स वुमन’शी बोलताना त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला त्या म्हणाल्या की, “नवरा वकील असल्याचा फायदा म्हणजे मी आंदोलन केलं की मला घरचा वकील लगेच सोडवायला ताबडतोब मिळतो. त्यामुळं वकीलाची फी देखील वाचते आणि माझा त्रास देखील कमी होतो. कारण तात्काळ माझी अख्खी वकिलांची टीमच तिकडे हजर होते.”

रुपाली पाटील ठोंबरे यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, अतिरीक्त डोनेशन घेणाऱ्या महाविद्यालया विरोधात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग निवडला. तसेच स्थानिक पातळीवर देखील त्यांनी समाजसेवा केली आहे. पेशाने वकील असल्यानं अनेकांचे कौटुंबिक वादविवाद सोडवून न्याय मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत मनसे ने आपला प्रचार उशीरा सुरू केल्यानं त्यांना हवं तस यश मिळालं नाही. रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षातून उमेदवारी मिळाली नाही. परंतू त्यांनी ज्या नेत्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या प्रचार सभा घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभ्या राहील्या.

KingMaker रुपाली पाटील ठोंबरे

Updated : 4 Nov 2019 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top