Home > रिपोर्ट > अखेर किमच्या बहिणीची सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी

अखेर किमच्या बहिणीची सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी

अखेर किमच्या बहिणीची सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी
X

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची लहान बहिण किम यो जोंगने अचानक म्हणजेच तब्बल दोन महिन्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. तब्बल दीड लाख आसनक्षमतेच्या मे डे स्टेडियममध्ये भाऊ किम जोंग उनसह यो जोंग नजरेस पडली. वॉशिंग्टनसोबत परमाणु शिखर वार्ता अपयशी ठरल्यानंतर यो जोंग सार्वजनिक कार्यक्रमातून बाहेर पडल्याचे बोलले जात होते.

https://twitter.com/AP/status/1135740043367211013

पण आता या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. स्टेडियमध्ये जिमनास्टीक प्लेअर्स, डान्सर, आणि प्रेक्षक उपस्थित होते. किम यो जोंग भावाप्रमाणेच उत्तर कोरियात प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी तिने दक्षिण कोरियाच्या प्योंगचांगमध्ये विंटर ऑलिंपिकचे नेतृत्व केले होते. यापूर्वी एप्रिलमध्ये संसदेत यो जोंग दिसली होती. दक्षिण कोरियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्यासोबत परमाणु शिखर वार्ता अपयशी ठरल्यामुळे किम जोंग उन यांनी आपल्या बहिणीला सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यावर बंदी घातली होती.

Updated : 6 Jun 2019 5:10 AM GMT
Next Story
Share it
Top