Home > रिपोर्ट > केतकी चितळे पुन्हा ट्रोल... हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेषावर वक्तव्य

केतकी चितळे पुन्हा ट्रोल... हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेषावर वक्तव्य

केतकी चितळे पुन्हा ट्रोल... हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेषावर वक्तव्य
X

आपल्या बोल्ड वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारी मराठी सीनेसृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, यावेळी तीच्या कोणत्या व्हिडीओवर ट्रोलींग होत नाहीये. तर तीच्या फेसबुक पोस्टवर नेटीझन्सनी हल्ला चढवलाय. केतकीने थेट जातीधर्मातील द्वेषावर वक्तव्य करताना मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजांवरही टीपण्णी केलीय. ‘आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!?’ असं म्हटलं जात, यात हिंदूंचीच चूक असून, हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेष कारणीभूत असल्याचं म्हटलंय.

यापुर्वीही केतकी चितळे तिच्या व्हिडीओ पोस्टवरील ट्रोलर्सच्या अश्लील शिव्यांना प्रतिउत्तर देत त्यांच्या शिव्यांमधील चुका दुरुस्त करण्याच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली होती.

संबंधित बातमी...

झवायला देतास का नाही रे, झवायला देतेस का?

मात्र, त्यावेळी तिला नेटीझन्सकडून मोठी पाठींबाही मिळाला होता. यावेळी तशी परिस्थिती दिसत नाहीये. इतरांच्या धर्मपालनावर टीका केल्यामुळे केतकीला चांगलच टोलवलं जातय. विशेष म्हणजे तीलाही त्या कॉमेंट्सवर प्रतिउत्तर देण्याचा मोह आवरत नाही. आणि तीला ज्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही त्यांच्या व्याकरण आणि भाषेच्या चुका काढून ती वेळ मारुन नेत आहे.

Updated : 2 March 2020 6:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top