Home > रिपोर्ट > न्यायाधीश पतीने केला पत्नीचा हुंड्यासाठी छळ मुख्य न्यायाधीशांना पाठवलेले पत्र

न्यायाधीश पतीने केला पत्नीचा हुंड्यासाठी छळ मुख्य न्यायाधीशांना पाठवलेले पत्र

न्यायाधीश पतीने केला पत्नीचा हुंड्यासाठी छळ मुख्य न्यायाधीशांना पाठवलेले पत्र
X

न्यायाधीश पती व सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याचे पत्र एका न्यायाधीशाच्या पत्नीने मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांना पत्र लिहून तक्रार केली. पीडितेने 29 जुलै चा पत्र पाठवले.या महिलेचा पती हा बारामतीतील न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे .त्यांचं लग्न 2007 मध्ये झाले त्यावेळेस हुंडा म्हणून पाच लाख रुपये फर्निचर संपूर्ण खर्च हा माहेरच्या कडून करण्यात आला.महिलांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांची जमीन ही पतीच्या नावावरती करावे त्यासाठी तिच्या वर दबाव टाकून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिच्या नावावर जमीन करण्यास नकार दिल्यानंतर सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. त्यानंतर ती लातूर येथे आईकडे राहण्यास आली. त्यानंतर पतीची बदली झाल्यानंतर पुन्हा सासरला राहायला गेल्यानंतर परत घरातून बाहेर काढले .पोलिसात तक्रार दिल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही व माहेरी राहण्याचा सल्ला पोलिस कर्मचाऱ्यांना दिलाअसे महिलेने पत्रात म्हटले आहे. मुख्य मुख्य न्यायाधीशांनी या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Updated : 2 Aug 2019 5:45 AM GMT
Next Story
Share it
Top