Home > News > पत्रकारांनो सावधान...

पत्रकारांनो सावधान...

पत्रकारांनो सावधान...
X

सुशात सिंह आत्महत्या प्रकरणाच्या वार्तांकन करण्याच्या पध्दतीवरुन माध्यमांवर सर्वच स्थरांतून टीका होतेय. यात चौकशी सुरु असलेल्या रिया चक्रवर्ती बाबत असभ्य भाषेचा वापर केला जातोय. एका वाहिन्याच्या प्रतिनिधीने तर LIVE सुरु असताना अश्लिल भाषेत शिवीगाळ केलेय.

पत्रकारांच्या मोकाट वार्तांकनाला लगाम घालण्यासाठी व या पुढे कोणत्याही महिलेची माध्यमांतून बदनामी होऊ नये यासाठी राज्य महिला आयोगाने पोलीसांना मध्यमांना समज देण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य महिला आयोगाकडून राज्याचे पोलीस महासंचालक PIS सुबोध कुमार जैस्वाल यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात महिला आयोगाने “काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी रिया चक्रवर्ती यांचे वार्तांकन करताना अश्लिल शब्द वापल्याचे राज्य महिला आयोगाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी प्रसारित झालेल्या चित्रफिती व समाज माध्यमातून प्रसिध्द झालेल्या चित्रफिती याची याची सत्यता पडताळून त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करावा.”

“त्याच बरोबत कोणत्याही महिलेसमंधी वार्तांकन करताना महिलांचा अनादर होऊ नये ही महिला आयोगाची ठाम भुमीका आहे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्देश देणारे परिपत्रक आपल्या स्थरावरुन सर्व माध्यमांना देण्यात यावे.” असं राज्य महिला आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे पत्रकारहो जरा वार्तांकन करताना जपून...

Updated : 8 Sep 2020 8:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top