Home > रिपोर्ट > गौरी लंकेश हत्या: औरंगाबादच्या आरोपीला झारखंडमध्ये पकडले

गौरी लंकेश हत्या: औरंगाबादच्या आरोपीला झारखंडमध्ये पकडले

गौरी लंकेश हत्या: औरंगाबादच्या आरोपीला झारखंडमध्ये पकडले
X

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने झारखंडमध्ये अटक केली आहे. त्याचबरोबर हा आरोपी ऋषिकेश देवरीकर हा मूळचा औरंगाबादचा असल्याची माहिती सांगितली जाते. आरोपी ऋषिकेश देवरीकर हा वेगवेगळ्या नावांनी झारखंडमधील धनबादमध्ये राहत होता. या हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी या 'लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या.

Updated : 10 Jan 2020 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top