Home > रिपोर्ट > "मी प्रथम की तू प्रथम यापेक्षा राष्ट्र प्रथम हे महत्वाचे" – अस्मिता पुराणिक

"मी प्रथम की तू प्रथम यापेक्षा राष्ट्र प्रथम हे महत्वाचे" – अस्मिता पुराणिक

मी प्रथम की तू प्रथम यापेक्षा राष्ट्र प्रथम हे महत्वाचे – अस्मिता पुराणिक
X

२०१९च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष जोरदार प्रचार करित असून अपक्षातूनही अनेक उमेदवार तयारीला लागले आहेत. त्यातच कल्याण लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार पत्रकार अस्मिता पुष्कर पुराणिक या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची निशाणी ही पत्रपेटी आहे. त्यांनी निवडणुकांसाठी आपल्याला जे काम करता येईल त्याचा संकल्प केला आहे. पाहुयात

१ ) महिला - मुली - बालके यांवर अत्याचार करणार्‍यांना "छत्रपती शासन" या प्रमाणे कठोर व तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी संसदेत सतत आग्रही भूमिका मांडून सदर व्यवस्थेत गतिमानता आणणे हे प्रमुख ध्येय आहे .

२ ) "राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण संस्थेमार्फत" नात ते आजी या सर्व वयोगटातील स्त्रियांना पुरातन मर्मविद्या , शिवकालीन लाठी - काठी , ज्यु - दो , कराटे , कुस्ती , बॉक्सींग आदीतील सोप्या ट्रिक्सद्वारा स्वसंरक्षण व प्रतिकाराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.

३ ) महिला - मुलींना जागतिक स्तरावरील बाजारपेठेत मागणी असलेल्या विविध व्यवसाय उद्योगांबाबत संपूर्ण प्रशिक्षण - मार्गदर्शन - अर्थसाह्य - मॅन्युफॅक्चरींग - व्यवस्थापन - मार्केटींग आदीबाबत साह्य करणारे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्वयंसिध्दा केंद्र" स्थापन करणार .

४ ) निराधार व्यक्ती , महिला , जेष्ठ नागरिक , विद्यार्थी , दिव्यांग , अंध , मुक - बधीर , स्पेशल किडस् , यांचा शोध घेऊन त्यांना केंद्र व राज्य शासकीय तथा आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी "पालकसंस्थेची" उभारणी केली जाईल .

५ ) लोकल रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होऊन सर्व प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी "शासकीय कार्यालये एक तास उशीराने" सुरू करावी यासाठी प्रयत्न करणार आहे .

६ ) विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, वाचक यांना संदर्भ - अभ्यासासाठी उपयुक्त जगभरातील उपलब्ध पुस्तकांच्या हार्ड व सॉफ्ट प्रती असतील अशी "सुसज्ज डिजिटल लायब्ररी" उभारुन सांस्कृतिक उपराजधानीचे नाव जगभरातील अभ्यासकांत नावाजले जावे यासाठी प्रयत्नशील असेन .

७ ) ऑलिंपिक सारख्या क्रिडा स्पर्धातून आपल्या मुलांनी देशाचे नाव सुवर्णाक्षरात कोरावे असे प्रत्येक पालकाला मनापासून वाटत असतं. परंतु प्रशिक्षणाच्या अभावाने ते शक्य होत नाही . याकरीता आंतरराष्ट्रीय दर्जाचे, "सर्व सोयींनी - साधनांनी व प्रशिक्षकांनी युक्त" असलेले क्रिडासंकुल स्थापन करणे .

८ ) कामावर जाताना लहान मुलं , शारिरीकदृष्ट्या अवलंबीत वयस्कर आई - वडील यांना कुठे सुरक्षित व आनंदी ठेवता येईल हा प्रश्न सतत भेडसावत असतो . यावर उपाय म्हणून "वायफायने जोडलेले व्हिडिओ कॉन्फरन्स सोय" असलेली डे केअर सेंटरची उभारणी करण्याचा माझा मानस आहे.

९ ) सामान्य "वैद्यकीय सेवा व रक्तपेढी" यासाठी सुध्दा आपल्याला व प्राणीमात्रांना अजूनही सर्वस्वी मुंबईतील सरकारी हॉस्पिटल्सवर अवलंबून रहावे लागते . यावर तोडगा म्हणून सरकारच्या अखत्यारीत असलेली हॉस्पिटल्स सर्वसोयींनी समृध्द करण्याची गरज आहे .

१० ) आपली संस्कृती टिकावी - वाढावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव - नवरात्रोत्सव मंडळे , सामाजिक संस्था अव्याहत प्रयत्न करत असतात . सर्वसामान्य नागरिकांतील कलागुण - नेतृत्व याच प्लॅटफॉर्मवरुन उदयास येते . समाजाचा मोठा आधार आहेत ही मंडळे. असे जरी असले तरी त्यांना अनेक अडचणींना तोंड देत अस्तित्व टिकवावे लागत आहे . या मंडळांची सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे जागा. या मंडळांना स्वतःची हक्काची जागा मिळाली तर ही मंडळे निश्चितच राष्ट्र उभारणीच्या कार्यात आणखी भरीव योगदान देऊ शकतील. म्हणून या मंडळांना स्वतःची हक्काची जागा मिळावी यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे .

११ ) प्रत्येक गावाला इतिहास हा असतोच. कल्याणला तर दस्तुरखद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र चरणस्पर्श झाला आहे. "डोंबिवलीतील आन व मान ठाकूर हे तर महाराजांच्या सैन्यात होते." कल्याण , आगासन , गजबांधण पाथर्ली , डोंबिवली , मलंगगड आदी गाव-शहरांना हजारो वर्षांचा मोठा इतिहास आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः "वीरगळी" उघड्यावर आढळतात. आपल्या अनास्थेमुळे आपण हा दैदिप्यमान इतिहास विसरत चाललो आहोत. हे रोखण्यासाठी व आपला हा वारसा जगासमोर आणण्यासाठी "दुर्गसंवर्धन करणाच्या संस्थांना शासकीय निधी व पूर्ण सहकार्य मिळावे" या साठी बांधिल आहे.

Updated : 15 April 2019 12:56 PM GMT
Next Story
Share it
Top