Home > रिपोर्ट > झारखंड : तीन वर्षाच्या मुलीवर सामुहीक बलात्कार करून मुंडकं छाटलं

झारखंड : तीन वर्षाच्या मुलीवर सामुहीक बलात्कार करून मुंडकं छाटलं

झारखंड : तीन वर्षाच्या मुलीवर सामुहीक बलात्कार करून मुंडकं छाटलं
X

उन्नावच्या घटनेची चर्चा ताजी असताना आणखी एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका तीन वर्षाच्या बालिकेचं अपहरण करून तिच्यावर सामुहीक बलात्कार केल्यानंतर तीचं रडणं थांबत नाही म्हणून तिचं मुंडकं शरीरावेगळं करून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. झारखंड इथली ही घटना आहे. टाटानगर रेल्वे स्टेशनवर आपल्या आई शेजारी झोपलेल्या एका मुलीचं अपहरण झालं होतं. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी अशाच प्रकारे अनेक बालिकांवर अत्याचार केल्याचं समोर आलंय.

रिंकू साहू, कैलास आणि मोनू मंडल अशा तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासाच समोर आलं की रिंकू साहू याने आईच्या शेजारी बसलेल्या लहान मुलीला उचलून नेलं. त्यानंतर रेल्वे स्टेशनपासून चार किमी अंतरावर तिच्यावर सामुहीक बलात्कार केला आणि नंतर तिचं रडणं थांबत नसल्याने तिचं मुंडकं छाटण्यात आलं.

या संदर्भात अधिक महिती देताना पोलीसांनी सांगितलं की, रिंकू साहू ची पत्नी तीन मुलांसह वेगळी राहते. रिंकू या आधी अशाच पद्धतीच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. जामीनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे. त्याची आई पोलीस कॉन्स्टेबल तर वडील सीआरपीएफ मध्ये जवान आहेत. रिंकू साहूची आई त्याला छोट्या मोठ्या गुन्ह्यातून वाचवायची म्हणून त्याचा धीर वाढला असं रिंकू च्या शेजाऱ्यांनी सांगीतलं.

रिंकू आणि कैलास च्या अटकेआधी मोनू मंडल या हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या आईच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली होती. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय महागात पडला असं हत्या झालेल्या मुलीच्या आईने म्हटलं आहे. मोनू मंडल या प्रियकरासोबत पळून जात असताना रात्री स्टेशनवर झोपलेले असताना हा प्रकार घडला. प्रथम संशय मोनू मंडलवर व्यक्त केल्यामुळे मोनू मंडलला अटक करण्यात आली.

Updated : 2 Aug 2019 9:24 AM GMT
Next Story
Share it
Top