Home > रिपोर्ट > जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं अफेअर जेव्हा पकडलं जातं...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं अफेअर जेव्हा पकडलं जातं...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं अफेअर जेव्हा पकडलं जातं...
X

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं अफेअर जेव्हा जगासमोर आलं तेव्हा काय झालं असेल. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्यांच्या पत्नीचं नाव होतं मॅकेंजी. मॅकेंजी ला जेव्हा तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे. असं समजलं तेव्हा तिनं बेजोस ला घटस्फोट दिला. मात्र, या सगळ्यामध्ये जेफ बेजोस चं अफेअर कसं बाहेर आलं? याबाबत तुम्ही ऐकूण थक्क व्हाल.

jeff bezos extra married affair leaked photosजेफ बेजॉस यांच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे लॉरेन. या लॉरेनच्या भावानचे हे प्रकरण मीडियाला दिलं असं बोललं जातं. या संदर्भात लॉरेनचा भाऊ मायकल सांचेजचा याच्यावर जोसेफ यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मायकलने माझ्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो लीक केले असा आरोप जोसेफ याने केला आहेत. दुसरीकडे मायकल ने हे आरोप फेटाळून लावले असून या आरोपांमुळे त्याची बदनामी झाली. त्यामुळे त्याने जेफ बेजॉसवर मानहाणीचा खटला दाखला केला आहे.

अमेरिकी मॅगझीन नॅशनल एनक्वायररने गेल्या वर्षी जानेवारीत बेजोस आणि लॉरेन यांचे फोटोंसोबत त्यांच्या अफेयरचा खुलासा केला होता. तर दुसरीकडे बेजोस यांचा फोन सौदी अरबच्या एका राजपुत्राने हॅक केल्याचा संशय द गार्डियन ने व्यक्त केला आहे.

मात्र, जगातील हायप्रोफाईल व्यक्तीच्या फोनमधील डाटा कसा बाहेर आला? हा संशोधनाचा विषय आहे.

Updated : 3 Feb 2020 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top