Home > रिपोर्ट > मोदींनी घोषित केला 'जनता कर्फ्यू'; 22 मार्च ला देशभरात लागू

मोदींनी घोषित केला 'जनता कर्फ्यू'; 22 मार्च ला देशभरात लागू

मोदींनी घोषित केला जनता कर्फ्यू; 22 मार्च ला देशभरात लागू
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रभाव लक्षात घेता आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशात 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू पाळा, कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा’ असं आवाहन केले आहे.

जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी, जनतेद्वारे लावण्यात आलेला कर्फ्यू, येत्या रविवारी म्हणजे 22 मार्चला हा कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. सकाळी 7 पासून रात्री 9 पर्यंत घराबाहेर पडू नये, कोणीही घराबाहेर पडू नका. जनता कर्फ्यु ही भारतासाठी मोठा कसोटीचा काळ आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारत किती तयार हे जगाला कळेल. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च ला देशात कर्फ्यू लावण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना शी दोन हात करणाऱ्या सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. स्वत:चा जीव संकटात घालून अनेक जण समाजाला सेवा देत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेक जण देशासाठी लढतायत. डॉक्टर, सफाई कर्मचारी, प्रसारमाध्यमं, अत्यावश्यक सेवा पुरवणारे ही देशाचे सैनिक आहेत. या २२ तारखेला या सैनिकांचं आभार मानूया रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपल्या दरवाज्यात उभं राहून, गॅलरीत उभं राहून टाळ्या-थाळ्या-घंटानाद करून या सैनिकांचे आभार मानूया.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर काही उपाय सापडलेला नाही, सुरूवातीला सामान्य वाटलं तरी हा रोग लगेच फैलावतो, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. असं म्हणत कोरोना वर कोणता ही इलाज नसल्याबाबत देशाला अवगत केलं.

सामान्यत: जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट येते तेव्हा ते काही देश किंवा राज्यांपुरते मर्यादित असते. मात्र, कोरोना ने संपूर्ण जग सध्या संकटात आहे. साधारणत: नैसर्गिक संकट देशांपुरतं मर्यादित होतं. मात्र, हे संकट जगभर पसरलं आहे. असं म्हणत कोरोना चे संकट किती मोठं आहे. याची व्याप्ती किती मोठी आहे. याची जाणीव मोदी यांनी देशाला करुन दिली.

पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धामुळेही जगातील इतके देश प्रभावित नव्हते, जितके कोरोनाने आहेत. पूर्ण जग कोरोनाच्या संकटातून जात आहे. कोरोनाच्या चा जगावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनो ने मानव जातीला संकटात टाकलं आहे. या दोन महिन्यांत भारताच्या 130 कोटी नागरिकांनी आवश्यक काळजी घेत कोरोना जागतिक साथीच्या रोगाचा जोरदार सामना केला आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून असे दिसते की, जागतिक महामारी कोरोनाबाबत आपण तितकेसे जागरुक नाहीत असं दिसतं, म्हणून, प्रत्येक भारतीयाने जागरूक असणे, सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. मी जेव्हा-जेव्हा देशाकडे काही मागितलं आहे. तेव्हा देशवासीयांनी मला निराश केलेलं नाही. मी आज तुमच्याकडे काही मागणार आहे, मला तुमचे पुढचे काही आठवडे हवे आहेत. माझा देशवासियांना आग्रह आहे, जर अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, शक्य तितकं काम घरातूनच करा, सरकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी, मीडिया यांची सक्रियता आवश्यकता आहे, मात्र अन्य नागरिकांनी स्वत:ला विलगीकरण करावं.

संकल्प आणि संयमाने कोरोनावर मात करु...

संयम ठेवा, घराबाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा, कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या काळात हे अत्यंत आवश्यक आहे. शक्य तितकं काम घरातूनच करा, सरकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी, मीडिया यांची सक्रियता आवश्यकता आहे. मात्र, अन्य नागरिकांनी स्वत:ला विलगीकरण करावं. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कडून येणाऱ्या सूचनांचं पालन करा. आपण संकल्प करूया की आपण स्वत: संक्रमीत होण्यापासून वाचूया आणि इतरांनाही वाचवूया. गर्दीत जाऊ नका, सोशल डिस्टन्सींग आवश्यक आहे. संकल्प आणि संयमाने आपण या जागतिक साथीला तोंड देऊ या. अशा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी देशाला दिला.

60-65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी संकल्प आणि संयम या दोन गोष्टींची नितांत गरज आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन देशवासियांना केलं आहे.

Updated : 19 March 2020 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top