Home > रिपोर्ट > प्रेमी युगुलावर हल्ला, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करु नका – सुप्रिया सुळे

प्रेमी युगुलावर हल्ला, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करु नका – सुप्रिया सुळे

प्रेमी युगुलावर हल्ला, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करु नका – सुप्रिया सुळे
X

एका प्रेमी युगुलाला काही जणांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जालना जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारातला हा व्हिडिओ आहे. यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची दखल घेत आरोपींवर कारवाईचे आदेश दिले आहत. तसंच व्हायरल व्हिडिओ थांबवण्याचेही आदेशही गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.

काय आहे व्हिडीओ...

या व्हिडिओमध्ये काही जण मिळून त्या तरुण आणि तरुणीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर तरुण तरुणीला कॉलर पकडून फरफटत नेत असल्याचं या व्हिडिओ दिसत आहे. तो तरुण आणि तरुणी गयावया करत असतानाही या टोळक्यातील मुलं त्यांना दमदाटी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे अजून समजू शकलेलं नाही.

दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रेमीयुगलास मारहाण करणाऱ्या गुराख्यांची धरपकड सुरू असून दोन ते तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय. हे प्रेमीयुगल बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल करु नका. असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं असून त्या दोनही मुलांचं वैयक्तिक आय़ुष्य आहे. तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. व्हिडीओ काढणारा आणि त्या मुलीवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी विनंती देखील त्यांनी या व्हिडीओ च्या माध्यमातून केली आहे.

Updated : 31 Jan 2020 4:26 PM GMT
Next Story
Share it
Top