Home > रिपोर्ट > इशरत जहा एनकाऊंटर प्रकरण पुन्हा चर्चेत

इशरत जहा एनकाऊंटर प्रकरण पुन्हा चर्चेत

इशरत जहा एनकाऊंटर प्रकरण पुन्हा चर्चेत
X

इशरत जहा... गेल्या 15 वर्षात कित्येकदा हे नाव आपण सतत ऐकलं असावं किंवा अनेक ठिकाणी पाहिलं असावं. 11 जून 2004 ला तिचा आपल्या तीन साथीदारांसोबत पोलिस एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला. तिच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप होता. 2004 ला झालेला एनकाऊंटर खोटा होता कि खरं होता यावर देखील अनेक चर्चा झाल्या मात्र तोडगा काही समोर आला नाही.

असो, हे नाव पुन्हा आज चर्चेत आलं आहे कारण इशरत जहा एनकाऊंटर खटल्यातील सीबीआई कोर्टाने गुजरात पोलिस दोन पूर्व अधिकारी डी.जी. वंजारा आणि एनके अमीन यांना आरोपमुक्त केलं आहे. सीबीआई या दोघांविरोधात केस सुरुच ठेवणार होती मात्र गुजरात सरकारने त्यांना परवानगी दिली ऩाही. त्यामुळे कोर्टाने दोघांच्याविरोधातील सगळ्या आरोंपांना रद्द करत त्यांना आरोपमुक्त केलं आहे.

कोण होती इशरत जहा?

इशरत जहां हिचं कुटुंब ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील राशिद कंपाउंडमध्ये स्थायिक होतं. तिचा जन्म 1985 साली झाला होता. मुंबईच्या गुरु नानक खालसा कॉलेजमधून ती बीएससी करत होती. सात बहिण-भावंडामध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर होती. तिचे वडिल मोहम्मद शमीम रजा एशियन कंस्ट्रक्शन नावाची कंपनी चालवायचे. आणि तिची आई शमीमा मुंबईतल्या वाशी परिसरात एका मेडिकल पैकेजिंग कंपनीमध्ये काम करायची. शिक्षणासोबतच इशरत जावेद उर्फ प्राणेश च्या येथे नोकरी करत होती. ती त्याचं अकाउंट्स सांभाळायची. नोकरीसंदर्भात इशरत जावेदसोबत टूरवर जायची.

कसा आणि कधी झाला एनकाऊंटर?

इशरत 11 जून 2004 साली जावेद सोबत नाशिकला गेली होती. तिच्या आईला जावेद सोबत तिनं जाणं पसंत नव्हत. त्यामुळे तिनं घरात कुणाला नाशिकला जाण्यासंदर्भात सांगितलं नाही. नाशिकला पोहचल्यानंतर तिनं घरी फोन केला होता. यानंतर झालं असं की 15 जूनला गुजरात पोलिसांनी के पत्रकार परिषद घेतली त्यात सांगितलं कि निळ्या रंगाची टाटा इंडिका कार मध्ये चार दहशतवाद्यांचा अहमदाबादच्या परिसरात पोलिसांनी खात्मा केला आहे. यात इशरत, जावेद सोबत आणखी दोघे होते.

पोलिसांनी सांगितलं की, हे चारही दहशतवादी सुसाइड बॉम्बर असून ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ना जीवेमारण्याची योजना करत होते.

कुटुंबियांनी सांगितलं इशरत निर्दोष होती...

एनकाऊंटर मध्ये इशरत ला मारल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी सांगितलं की इशरत ही निर्दोष होती. तसेच मुंबई पोलिसांनी तिचा बॅकग्राऊंड क्रिमिनल नसल्याचं सांगितलं. या माहितीनंतर राजकारण चांगलचं तापलं गेलं. विरोधकांनी या एनकाऊंटरला खोट्यात जमा करत सीबीआई तपासाची मागणी केली. त्यावेळी पोलिसांवरही आरोप झाले की हे निर्दोष मुस्लीमांना मारून एनकाऊंटर सांगतायेत.

ती लष्करसाठी काम करायची

याच दरम्यान लष्करच्या मुखपत्र गजवा टाइम्सने छापलं की इशरत लष्करसाठी काम करत होती. तसेच ती आपल्या पतिसोबत या मिशनवर काम करत होती. 26/11 हल्ल्यातील डेविड हेडली ने फेब्रुवारी 2016 ला मोठा खुलासा केला. त्यात इशरत जहा लष्करसाठी फिदायीन हल्लेखोर म्हणजे सुसाइड बॉम्बर होती. असं सांगितलं.

तर दुसरीकडे महानगर दंडाधिकारी एसपी तमांग यांनी 7 सप्टेंबर 2009 मधल्या तपासनीचा अहवाल जमा केला. या अहवालानुसार हा एक खोटा एनकाऊंटर होता. या रिपोर्टमध्ये गुजरात पोलिस एनकाऊंटर स्पेशलिस्ट डीजी वंजारा वर कोल्ड ब्लडेड मर्डरचा आरोप लावला होता. या अहवालात सांगितलं होतं की इशरत जावेद सोबत दोन जणांना पोलिसांनी 12 जून ला मुंबईमध्ये पकडण्यात आलं. तिथून त्यांना अहमदाबादला आणलं गेलं. यानंतर 14 जून च्या रात्री त्यांना पोलिस कस्टडीतच मारलं गेल आणि दुसऱ्यादिवशी एनकाऊंटर झालं म्हणून सांगितलं गेल.

तसंच रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की मारल्या गेलेल्यांचा लष्करशी संबंध असल्याचा कोणाताही पुरावा मिळाला नाही . यात वंजारा आणि अमीन यांची नावं समोर आली. ह्या दोघा अधिकाऱ्यांना सोहराबुद्दीन खटल्यातही आरोपी बनवण्यात आलं होतं. गुजरात उच्च न्यायालयाने पहिल्यांदा या रिपोर्टवर स्टे लावला आणि मग ऑगस्ट 2010 ला रद्द केला.

एसआईटीच्या रिपोर्टमध्ये ही हा एनकाऊंटर खोटा निघाला. या प्रकरणाच्या तपास कर्नल सिंह यांच्या नेतृत्वात बनवण्यात आलेली एसआईटीकडे देण्यात आला. या टीम ने 21 नोव्हेंबर 2011 ला गुजरात हायकोर्टा रिपोर्ट दाखल केला . यात ही तेच सांगण्यात आलं की हा एनकाऊंटर खोटा आहे. त्यानंतर कोर्टाने एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात हत्येच्या गुन्ह्यात एफआईआर दाखल करण्याचे निर्देश दिले. आईपीएस रँकमधील अधिकाऱ्यांसोबत 20 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला..

सीबीआईने प्रकरणाचा तपास सुरु केला, त्यांच्यामते आईबी चे ऑफिसर राजेंद्र कुमार यांनी गुजरात कार्डरचे आईपीएस ऑफिसर पीपी पांडे यांच्यासोबत मिळून हा एनकाऊंटरचा प्लान बनवला होता, फेब्रुवारी 2013 मध्ये सीबीआई ने एनकाऊंटरच्यावेळी क्राईम ब्रांच च्या एसीपी जीएल सिंघल ला अटक केली. तर दुसरीकडे काही पोलिसांनाही अटक केलं. 90 दिवसांमध्ये सीबीआई चार्जशीट दाखल करु शकली नाही. त्यामुळे अमीन सोबत सगळ्यांना जामिन मिळाला आहे.

Updated : 3 May 2019 7:02 AM GMT
Next Story
Share it
Top