आयएएस अधिकारी महिलेचं स्तुत्य पाऊल.. सरकारी रुग्णालयात बाळाला दिला जन्म
X
सरकारी नोकरी आणि योजना मिळाव्यात म्हणून झटणारे सामान्या माणसं जेव्हा आपल्या मुलांना जन्म देण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा मात्र, खाजगी रुग्णालयाची वाट धरतात. परंतू अशा मनोवृत्तीला छेद देत चक्क एक महिला अधिकारी आपल्या बाळाला सरकारी रुग्णालयात जन्म देण्याच्या तिच्या निर्णयामुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे. झारखंडच्या गोंडा भागातील या आयएएस अधिकारी महिलेने खाजगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण देशासमोर तिने एक उदाहरण ठेवलं आहे.
आपल्या गोंडस बाळाला सरकरी रुग्जणालयात जन्म देणाऱ्या या महिला अधिकारी आहेत किरण कुमार पासी. त्यांच्या या निर्णयामुळे सोशल मिडियावर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. सकाळपासून सोशल मीडियावर नवजात बाळ आणि आईचा फोटो व्हायरल होतोय. खाजगी रुग्णालयाचा खर्च जास्त असतो, त्यामानाने सरकारी रुग्णालयामध्ये कमी खर्चात सोयी सुविधा उपलब्ध असतात. सिविल सर्जन एसपी मिश्रा यांनी सांगितलं की, नवजात बाळ आणि आई दोघे ही सुखरूप आहेत. मोठ्या अधिकाऱ्याने आमच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला आणि आमच्या रुग्णालयाची शान वाढवली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे लोकांचा सरकारी रुग्णालयावर विश्वास आणखी वाढेल.
किरण कुमारी ह्या पुढील काही दिवस डॉक्टरांचा निरीक्षणाखाली राहणार आहेत. तिचे अभिनंदन करण्यासाठी अनेक सरकारी अधिकारी रुग्णलयात पोहोचले. सरकारी अधिकाऱ्यांसोबत पत्रकार रवीश कुमार यांनी सुद्धा सोशल मीडियावर शुभेच्या दिल्या. किरण कुमार पासी यांनी नागरिकांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.