Home > रिपोर्ट > मराठमोळ्या श्रद्धानं जिंकली ‘ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धा’

मराठमोळ्या श्रद्धानं जिंकली ‘ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धा’

मराठमोळ्या श्रद्धानं जिंकली ‘ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धा’
X

लंडन येथे रंगलेल्या ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजनं मिसेस ब्रिटएशियाचा किताब पटकावला आहे. ब्रिटएशियाथ ही स्पर्धा प्रामुख्यानं आशियातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते.

कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले आशियातील नागरिक या स्पर्धेत भाग घेतात. यंदा मिसेस ब्रिटएशिया २०१९चा किताब श्रद्धानं आपल्या नावावर केला आहे.

श्रद्धा मुळची मुंबईतील गिरगाव येथील असून लग्नानंतर ती लंडनमध्ये स्थायिक झाली. लंडनमधील हॅरो शहराचे महापौर नितीन पारेख लंडनमध्ये स्थायिक असलेल्या आशियातील तरुण-तरुणींसाठी ही स्पर्धा आयोजित करतात. दरवर्षी मोठ्या उत्साहात अनेक तरूण मंडळी या स्पर्धेत आपलं नशीब आजमवतात.

Updated : 20 Oct 2019 10:33 AM GMT
Next Story
Share it
Top