Home > रिपोर्ट > आरोग्यसेवेशी जडले नाते...

आरोग्यसेवेशी जडले नाते...

आरोग्यसेवेशी जडले नाते...
X

डॉ. हर्षा नन्नावरे ही गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील गट्टा या प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिने आपले एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षाची बांधपत्रिक सेवा पूर्ण करण्यासाठी मुद्दाम हा ग्रामीण भाग निवडला.

गोंड जमातीची बहुलता. येथील लोकांच्या आरोग्याची पूर्ण मदार सरकारी आरोग्य सुविधांवरच अवलंबून. दळणवळणाची साधनेही मोजकीच. त्यामुळे बाहेर जाऊन आरोग्य सुविधा घेणे येथील लोकांसाठी जितके कठीण तितकेच खर्चाचे. अशा वेळी आपण लोकांना जास्तीत जास्त सेवा देऊन शकलो पाहिजे ही जिद्द मनात बाळगून हर्षा येथे वैद्यकीय सेवा देत आहे. डॉ. हर्षा स्वतः माना समाजाची. आदिवासी समजाच्या अडचणी समस्या ती जाणून होती. त्यामुळे गट्टा येथे आरोग्यसेवा देताना तिची नाळ या लोकांशी जुळली गेली.

एमबीबीएस पूर्ण करून अशा दुर्गम भागांत सेवा देण्याचा निर्णय घेणे हा एक धाडसीच निर्णय. गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी सुरू केल्या ‘निर्माण’ या अनौपचारिक सामाजिक शिक्षण प्रक्रियेच्या मुशीतून निघालेल्या डॉ. हर्षा चा समाजसेवेप्रती असलेला दृष्टीकोण, हा निर्णय घेण्यामागची तिची भूमिका काय आणि तिचा प्रवास नक्की पहा.

https://youtu.be/77JtMLVfEdk

Updated : 9 Jan 2020 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top