इंदुरीकर महाराजांचा ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अखेर खुलासा…
X
सम विषम तारखेच्या वादग्रस्त विधानावरुन इंदुरीकर महाराजांना (Indurikar Maharaj) आरोग्य विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार अखेरच्या दिवशी इंदुरीकरांनी आपली बाजू मांडली आहे. “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही.” असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे.
संबंधीत बातमी..
- वादग्रस्त इंदुरीकरांच्या पाठीशी का उभी राहतेय नारीशक्ती
- ‘बुलाती है मगर जाने का नही’, तृप्ती देसाईंचं इंदुरीकरांना आव्हान
सोबतच “मी समाज प्रबोधन करत असल्यानं मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,” असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला आहे.
इंदुरीकर काय म्हणाले होते?
इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या आपल्या कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शरीर संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदुरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.” या वक्तव्य़ामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण समोर आले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली होती.