Home > रिपोर्ट > महिला क्रिकेट विश्वचषकाची भारताला हुलकावणी

महिला क्रिकेट विश्वचषकाची भारताला हुलकावणी

महिला क्रिकेट विश्वचषकाची भारताला हुलकावणी
X

ऑस्ट्रेलियामधील महिला T20 विश्वचषकात आँस्ट्रेलियाने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले असुन भारताला अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली आहे. आँस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला 20 शतकांमध्ये आँस्ट्रेलियाने 184 धावा करत भारतासमोर 185 धावांचे आवाहन ठेवले.

185 धावांचे पाठलाग करताना भारतीय महिलांचा संघ 99 धावांमध्येच गारद झाला. भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत धडक मारल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र खेळाडूंची कामगिरी आणि निकाल बघता त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे महिला T20 विश्वचषकावर आपले नाव कोरण्यासाठी भारताला 2022 ची वाट बघावी लागणार आहे.

Updated : 8 March 2020 6:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top