Home > रिपोर्ट > ICC Women's T20 World Cup: भारताची सेमीफायनलमध्ये झेप

ICC Women's T20 World Cup: भारताची सेमीफायनलमध्ये झेप

ICC Womens T20 World Cup: भारताची सेमीफायनलमध्ये झेप
X

महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध न्युजीलंड या दोन संघांमध्ये शेवटच्या शेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने न्युजीलंडवर ३ रनांनी मात केली आहे. या शानदार विजयासह भारताने सेमीफायनलचा टप्पा गाठला असून यापुर्वी ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश या संघावरही मात केलीय. महिला टी-२० विश्वचषक मालिकेतील भारताचा हा सलग तीसरा विजय आहे. तर, सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहीला संघ ठरला.

सामन्यात न्युजीलंड संघाची कर्णधार सोफी डिवाइनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम भारतीय महिला संघाने फलंदाजी करताना ओपनर शेफाली वर्मा हिने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यष्टीरक्षक तानिया भाटिया हिनेही २३ धावा करत शेफालीला चांगली साथ दिली. २० षटकात भारताने ८ गडी गमावून न्युजीलंडसमोर १३३ धावांचं आव्हान उभं केलं. या बदल्यात किवी संघाने ६ विकेट गमावून १२९ धावा केल्या. शेफालीला ‘प्लेयर ऑफ द मैच’ने गौरवण्यात आले आहे.

Updated : 27 Feb 2020 2:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top