Home > रिपोर्ट > भारत - पाकिस्तान क्रिकेटवरुन दोघी भिडल्या सोशल मीडियावर

भारत - पाकिस्तान क्रिकेटवरुन दोघी भिडल्या सोशल मीडियावर

भारत - पाकिस्तान क्रिकेटवरुन दोघी भिडल्या सोशल मीडियावर
X

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना झाल्यानंतर वेगवेगळे वाद निर्माण झाले असे अनेक वेळा घडले आहे.

२०१९ चा वर्ल्ड कप भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर सोशल मीडिया वर जणूकाही एक युद्धच सुरु झालं आहे. मात्र हे युद्ध क्रिकेट प्रेमींचं नसून सानिया मिर्झा आणि वीणा मलिक यांच्यात सुरु झाले आहे.सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या एका व्हिडीओमुळे वादाला सुरुवात झाली. ज्या दिवशी क्रिकेट सामना होणार होता त्याच्या आदल्यादिवशी ट्वीटर वर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आणि त्या व्हिडीओमध्ये सोनिया,शोएब आणि त्यांचा परिवार कश्या पद्धतीने मज्जा करत आहे ते दिसत होते. परंतु भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान हरल्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसरवला गेला.

या व्हिडीओ ला उत्तर देतांना सानियाने ज्या व्यक्तीमार्फत ते पसरवले गेले त्याच्या युजर अकाउंटला @ करत सणसणीत टोला मारला कि “हा व्हिडीओ कुठलीही परवानगी न घेता पसरवला आहे. आणि पाकिस्तानचे खेळाडू सामना हरल्यानंतर हि खाऊ पिऊ शकतात.”

त्यांनतर पोस्ट करणाऱ्या युजर च अकाउंट डिलीट करण्यात आले. मात्र या घटनेच्या निमित्ताने वीणा मलिक ज्या पाकिस्तानच्या मॉडेल आहेत.त्यांनी सानियाला टार्गेट केले आणि फक्त एवढेच नाही तर सानिया तिच्या मुलाच्या खाण्यापिण्याकडे कसे दुर्लक्ष करते या संदर्भात देखील ट्वीट केलं https://twitter.com/MirzaSania/status/1139950267619692544 … त्याला रिट्वीट करत सानिया म्हटली कि “मी माझ्या मुलाच्या खाण्या पिण्याच्या बाबतीत निष्काळजी आहे पण तू तर त्याच्या कुठल्याही भावनांचा विचार करत नाही”. https://twitter.com/MirzaSania/status/1140702012113334278 आणि विना मलिक यांचा एक फोटो ट्वीट केल. मात्र हे ट्वीट लगेच डीलीट केले. असे वीणा यांनी सांगितले. अश्या पद्धतीने सानिया मिर्झा आणि विना मलिक यांचं पालकत्वावर रिट्वीट झालेलं आहे. हे सगळं प्रकरण सोशल मिडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत पाक सामना त्यात पाकिस्तानचा झालेला पराभव आणि ह्याच मुद्द्याला घेऊन सानिया मिर्झा यांना टार्गेट केलं जावं व त्याही पुढे जाऊन विना व सानिया यांच्यात ज्या पद्धतीने द्वंद छेडलं गेलेलं आहे व यामध्ये मूळ मुद्दा बाजूला राहून अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर दिले अन् महत्वाचा मुद्दा विसरून त्या दोघी या युद्धात सामील झाल्या.

Updated : 18 Jun 2019 9:59 AM GMT
Next Story
Share it
Top