Home > रिपोर्ट > निर्भया बलात्कार प्रकरण : गुन्हेगारांची फाशी कायम ...

निर्भया बलात्कार प्रकरण : गुन्हेगारांची फाशी कायम ...

निर्भया बलात्कार प्रकरण : गुन्हेगारांची फाशी कायम ...
X

निर्भया बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चारपैकी दोन आरोपींची क्युरेटिव याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे आरोपींच्या फाशीतला मोठा अडथळा दूर झालाय. गेल्या आठवड्यात चार आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला होता. चार आरोपींविरुध्द न्यायालयानं डेथ वॉरंटही जारी केलं होत.

आरोपींकडे कुठले पर्याय शिल्लक आहेत?

चारपैकी दोन आरोपी, विनय शर्मा, मुकेश सिंह आता राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज दाखल करु शकतात. मात्र राष्ट्रपतींकडून या आरोपींना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तर उर्वरीत दोन आरोपी अजूनही न्यायालयात क्युरेटिव याचिका आणि राष्ट्रपतीकडे दया अर्ज दाखल करु शकतात.

फाशीच्या शिक्षेची तयारी सुरु

दरम्यान तिहार तुरुंगात या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु आहे. गेल्या रविवारी जेल प्रशासनाने रंगीत तालीम म्हणून या आरोपींना डमी फाशी दिली. तिहारच्या जेल क्रमांक ३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे.

Updated : 14 Jan 2020 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top