Home > रिपोर्ट > प्रसूती करताना मातांच्या मृत्यूमध्ये वाढ

प्रसूती करताना मातांच्या मृत्यूमध्ये वाढ

प्रसूती करताना मातांच्या मृत्यूमध्ये वाढ
X

महिलांमध्ये अशक्तपणा जास्त प्रमाणात जाणवतो त्यामूळे महिलांनी आपल्या खानपानावर लक्ष दिलं पाहीजे असं वारवांर डॉक्टर सांगतात. जेणेकरुन मिळणाऱ्या पोष्टीक आहारामुळे महिलांच जीवमान सुधारण्यास मदत होते. परंतू राज्यांतील माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील आरोग्य विभाग पुढे आला आहे. यासाठी या विभागाने विशेष आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील आरोग्य विभागाला माता मृत्यूच्या सनियत्रंण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

राज्यांत मातांच्या मृत्यू दराची संख्या गंभीर असून दर १ लाख प्रसूतीमागे माता मृत्युचा दर ६१ इतका आहे. त्यामुळे माता मृत्युच प्रमाण प्रतिलाखामागे ३० एवढे कमी करायचे आहे. या मृत्यू मागचे कारण वाढणारा रक्तदाब, प्रसूतीपूर्व किंवा त्यानंतर होणारा रक्तस्त्राव, जंतूदोष या तीन आरोग्य समस्यामूळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. महिलांना या मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी कुटूंब कल्याण कार्यालयातर्फे आरोग्य केंद्रातील उपचार व काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. माता मृत्यू कमी करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.

Updated : 22 Dec 2019 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top