Home > रिपोर्ट > महापूरात घर पूर्णपणे ढासळलं पण ढासळल्या नाहित कमलताई.

महापूरात घर पूर्णपणे ढासळलं पण ढासळल्या नाहित कमलताई.

महापूरात घर  पूर्णपणे ढासळलं पण ढासळल्या नाहित कमलताई.
X

'साथी कमलताईंचं घर महापूरात पूर्णपणे ढासळलं पण ढासळल्या नाहित कमलताई कारण त्यांच्यासोबत होते त्यांचे सेवादल साथी!!'

नमस्कार मित्रांनो,

हे फक्त राष्ट्र सेवा दलातच होते...

आपल्याच परिवारातील सदस्य साथी सौ.कमलताई शिर्के यांचे रहाते घर महापुर कालात पुर्ण पणे ढासळले. तरी हिम्मतवाल्या कमलताईंच्या मदतीला सेवा दल सैनिकांच्यासह मुंबई हून आठ लोकांची टीम धाऊन आली... मागचा पुढचा विचार न करता श्रमदानाने मलवा हटविण्यास सुरवात केली.....

सहभागी... सदाशिव मगदूम, दिनकर आदाटे, रोहीत शिंदे, अक्षय, ऐश्वर्या, स्नेहा, सारा, योगेश, शिवकुमार, प्रसाद, आकाश, पी.डी. कुंडले, मुंबई ची आठ जणाची टीम व नगरची सहा लोकांची टीम.

श्रमदान पथक लागले कामाला, एका दिवसात मिरज राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांनी एन.ए.पि.एम.मुंबई आणि संगमनेर येथून आलेल्या श्रमदान पथकासह सांगली येथील सौ कमल शिर्के यांचे महापुरात जमीनदोस्त झालेल्या घराचे सर्व साहित्य विटा माती पत्रे सह भांडी व ढिगार्या खालील सर्व साहित्य काढुन आपले कर्तव्य पार पाडत सेवा दलाचे सैनिक म्हणून काम केले.

सदाशिव मगदूम, माजी महामंत्री, राष्ट्र सेवा दल

मिरज

Updated : 27 Aug 2019 7:18 AM GMT
Next Story
Share it
Top