Home > रिपोर्ट > राज्यस्थानमध्ये राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देण्यात कचरतायत का?

राज्यस्थानमध्ये राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देण्यात कचरतायत का?

राज्यस्थानमध्ये राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देण्यात कचरतायत का?
X

Courtesy : Social Media

देशात सध्या लोकसभा निवडणूका सुरु आहेत. भारतात एकूण ९० कोटी मतदार आहेत. या ९० कोटी पैकी ४३ कोटीहून अधिक महिला मतदार आहेत. म्हणजेच जवळ जवळ निम्म्याहून थोड्या कमी प्रमाणात महिला उमेदवारांची संख्या दिसून येते. परंतू महिलांना संसदेत प्रतिनिधित्व देण्याबाबत एकूणच सर्व राज्यात चित्र निराशा जनक आहे. त्यातच पद्मावत सारख्या चित्रपटातून राजस्थानमध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोण पुन्हा एकदा जगासमोर आला. राजस्थानमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. मात्र, या 25 जागांचा विचार केला तर महिलांना प्रतिनिधीत्व राजकीय पक्ष कचरत असल्याचं दिसून येत आहे.

यावेळी कॉग्रेसने लोकसभेतील एकूण 25 जागांपैकी केवळ चार जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने तीन जागांवर महिला उमेदवारांना तिकिट दिले आहे. कॉंग्रेसने जयपुर(शहर), जयपुर (ग्रामीण), नागौर आणि दौसा या चार जांगावर महिला उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपने राजसमंद, भरतपुर आणि दौसा या जागांवर महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.

Courtesy : Social Media

लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महिलांना कमी उमेदवारी देण्याच्या मुद्यावर पीपल्स यूनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) च्या कविता श्रीवास्तव यांनी राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व खूप कमी असल्याचे सांगत यासाठी सर्व राजकीय पक्षांना जबाबदार धरले आहे. देशामध्ये फक्त तृणमूल कॉंग्रेंस (टीएमसी) ने बहुतेक महिलांना प्रतिनिधित्व दिल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर केला जात नाही तोपर्यंत कोणताही पक्ष महिलांना योग्य प्रतिनिधित्व देणार नाही. कारण कोणत्याही राजकीय पक्षाला महिलांना सोबत घेऊन सरकार चालावायचं नाही.

राजकीय पक्षांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही आणि या बाबतीत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यत महिला वंचितच राहतील. तसंच महिलांना 33 टक्के आरक्षण न मिळण्याला राजकीय पक्षच जबाबदार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Courtesy : Social Media

राजस्थान महिला आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते सुमन शर्मा यांनी या संदर्भात बोलताना जो पर्यंत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार नाही. तो पर्यत महिलांना विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही. आजही 16 व्या लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व 11.3 टक्के आहे.

राजस्थानमध्ये राज्यात एकूण चार कोटी 84 लाख 79 हजार 229 मतदारांपैकी 2 कोटी 32 लाख 14 हजार 231 महिला मतदार आहेत. तर 2 कोटी 52 लाख 64 हजार 998 पुरुष मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारीही वाढली आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी 44.85 टक्के होती, जी 2014 मध्ये वाढून 61.39 टक्के झाली. मागच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सहा महिला उमेदवार उभे केले होते. 2009 च्या शेवटच्या दोन लोकसभा निवडणुकांत 31 महिलांनी आपली नशीब आजमावले होते. त्यापैकी तीन विजयी झाल्या. यानंतर, 2014 मध्ये 27 महिलांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी केवळ एक महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.

Updated : 5 May 2019 7:27 AM GMT
Next Story
Share it
Top