पुण्यात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
Max Woman | 17 May 2019 1:40 PM IST
X
X
महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्यात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार पुण्यातील महिलांचे प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या आकडेवारीनुसार पुण्यातील महिलांचे अशा प्रकारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण तुलनेने कमी आहे मात्र परजिल्ह्यामधून उपचारांसाठी आलेल्या महिलांचे प्रमाण अधिक वाढलेलं आहे. गेल्या वर्षभराचा आकडा पाहीला तर ९४ महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे.
यामध्ये पुण्यातील २० महिलांचा समावेश आहे. गरोदर मातांचे मृत्यूंचे प्रमाण करण्यासाठी २०१० साली शासनाने आदेश काढला होता.या आदेशानुसार पुणे महापालिकेने सर्वात पहिली समिती संघटन करून पालिकेचे आरोग्य प्रमुख, सहायक आरोग्य अधिकारी यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. याची कल्पना सर्व खाजगी रुग्णालयांना याविषयी कळविण्यात आले होते. त्याचबरोबर गरोदर माता मृत्यूंचा अहवाल पालिकेला पाठविण्याच्या सुचनाही पालिकेने दिल्या असून या समितीची दरमहिन्याला बैठक देखील घेतली जाते.
दरम्यान पालिकेकडून तीन प्रकारांमध्ये (डिले १ ते डिले ३) या मृत्यूंचे वर्गीकरण केले जाते यामध्ये डिले १ मध्ये प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतरही महिला रुग्णालयात दाखल होत नाही. डिले २ मध्ये जर गरोदर महिलेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असता मृत्यू आणि तिसऱ्या डिले ३ मध्ये डॉक्टर किंवा रुग्णालयाकडून कोणतीही सुविधा अपुरी पडली किंवा आलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाला असेल तर, असे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
यावरती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पहिल्या दोन प्रकारांमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला असता २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.
वर्ष प्रसुतीदरम्यान मृत्यू महापालिका हद्दीतील महिला
2014-15 66 26
2015-16 53 13
2016-17 49 19
2017-18 62 19
2018-19 94 20
Updated : 17 May 2019 1:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire