गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यशोमती ठाकुरांचा दिलासा
X
राज्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पावसाने उर्वरित पिकांचेही मोठे नुकसान केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला . पावसाने नष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात थंडीला सुरवात झाली असून गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यातल्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. जिल्ह्यातील काही भागला गारपिटीचा फटका बसला आहे. काही भागात गारांचा पाऊस पडला. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात आज झालेल्या गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामा करण्याचे आदेश आमदार आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिले. त्याचबरोबर हे सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासा त्यांनी दिला. वेगवेगळ्या संकटातून सावरतांना शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे.
https://youtu.be/wbAG_UM4pGk