Home > रिपोर्ट > मासिक पाळीत महिलेनं जेवण बनवलं तर ती पुढच्या जन्मात कुत्री होईल - स्वामी कृष्णस्वरुप

मासिक पाळीत महिलेनं जेवण बनवलं तर ती पुढच्या जन्मात कुत्री होईल - स्वामी कृष्णस्वरुप

मासिक पाळीत महिलेनं जेवण बनवलं तर ती पुढच्या जन्मात कुत्री होईल - स्वामी कृष्णस्वरुप
X

“जर आपण मासिक धर्म (पाळी) असलेल्या महिलेनं बनवलेल्या आहाराचं एकदाही सेवन केलंत तर, पुढील जन्मात तुम्ही नक्कीच बैलाचा जन्म घ्याल. जर एखाद्या मासिक धर्म असलेली महिला जी आपल्या पतीसाठी जेवण बनवते, तीचा निश्चितपणे कुत्रीच्या रुपात पुनर्जन्म होईल.” असं धक्कादायक वक्तव्य गुजरातमधील स्वामीनारायण भुज मंदिर संस्थान चालवणाऱ्या स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केलंय. 'मुंबई मिरर'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. आपल्या अनुयायांना अशाप्रकारे चुकीचे उपदेश करणारा त्यांचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामुळे सर्वत्र नाराजीचे सुर उमटत आहेत.

संबंधित व्हिडीओ क्लीप ही स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांच्या एक वर्षापुर्वीच्या प्रवचनादरम्यान चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओतून घेण्यात आल्याचं म्हटलं जातय. यानंतर त्यांनी म्हटलं की, “मला हे ज्ञान त्या गुरुंकडून प्राप्त झालंय ज्यांनी मला मासिक धर्माच्या रहस्यांविषयी बोलण्यास मनाई केली होती मात्र, मी नाही बोललो तर तुम्हाला हे कधीच कळणार नाही, पुरुष अनुयायांना जेवण कसं बनवायचं माहिती असलं पाहिजे जेणेकरुन धर्माचे नियम अबाधित राहतील.”

स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी पुरुष अनुयायांना चेतावणीही दिली की, “भलेही तुम्ही मासिक धर्म असलेल्या स्त्रीकडून बनवलेल्या अन्नाचं सेवनं कराल पण तीला याची समज नाही की, या तीन दिवसात तीने बनवलेल्या अन्नाचा काय प्रभाव पडतो. या बिंदुमधील प्रत्येकाला शास्त्रात परिभाषित करण्यात आलं आहे. म्हणुन लग्नापुर्वीच तुम्हाला जेवण बनवता आलं पाहिजे.”

Updated : 18 Feb 2020 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top