Home > रिपोर्ट > किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार? निर्भयाच्या आईचा सवाल

किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार? निर्भयाच्या आईचा सवाल

किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार? निर्भयाच्या आईचा सवाल
X

'न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार,' निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात चार आरोपींची फाशी दुसऱ्यांदा टळली आहे. पाटीयाला हाऊस कोर्टानं पुढच्या आदेशापर्यंत फाशी थांबवली आहे. कोर्टानं अक्षय, विनय, पवन आणि मुकेश या चारही आरोपींचे डेथ वाँरटही रद्द केले आहेत. फाशीचे वॉरंट रद्द केल्यानंतर निर्भयाच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“आरोपींचे वकील ए.पी. सिंग हे मला आव्हान देऊन गेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे ही फाशी मी अनंत काळासाठी स्थगित करुन दाखवेन. मात्र केंद्र सरकार, दिल्ली सरकार, न्यायालय या सगळ्यांना सांगणं आहे की जोपर्यंत चार जणांना फाशी होईपर्यंत मी गप्प बसणार नाही. आज जो निर्णय कोर्टाने दिला आहे त्याने पु्न्हा एकदा आम्हाला या सगळ्या आरोपींपुढे झुकावं लागल्याची भावना आहे. आरोपींचे वकील सरळ सांगून गेले आहेत की या दोषींना फाशी होणार नाही. आणखी किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार आहे?”

त्यामुळे आता ‘तारीख पे तारीख’ असा प्रवास निर्भयाच्या आईचा सुरु असून निर्भयाच्या आईने सरकारला, न्यायालयाला लवकरात लवकर न्याय देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान या चारही आरोपी पैकी तीन आरोपींना एक फेब्रुवारीला फाशी दिली जावू शकते असा युक्तिवाद तिहार कारागृह प्रशासनाच्या वतीनं कोर्टात करण्यात आला. आरोपींचे वकील एपी सिंह यांनी तीन आरोपीची याचिका प्रलंबित असल्यामुळे एका आरोपीला फाशी देने बेकायदेशीर ठरेल असा युक्तिवाद कोर्टापुढं केला.

दूसरिकडे निर्भयाच्या आईच्या वकीलांनी आरोपी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेळत असल्याचा आरोप केलाय.

यापुर्वी कोर्टानं ७ जानेवारीला या आरोपीविरुध्द डेथ वाँरट जारी केला होता. त्यानंतर १७ जानेवारीला दुसरा डेथ वाँरट बजावला होता.

चार आरोपींपैकी विनय याच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे पोहोचला आहे. तर आरोपी अक्षय आणि पवन याचा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज प्रलंबित आहेत. यापुर्वी आरोपी पवन याचा अल्पवयीन असल्याचा दावा सुप्रीम कोर्टानं फेटाळला होता.

Updated : 31 Jan 2020 4:22 PM GMT
Next Story
Share it
Top