Home > रिपोर्ट > माझी खात्री होती उद्धव साहेब मलाच उमेदवारी देतील - रश्मी बागल

माझी खात्री होती उद्धव साहेब मलाच उमेदवारी देतील - रश्मी बागल

माझी खात्री होती उद्धव साहेब मलाच उमेदवारी देतील - रश्मी बागल
X

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दिंगबरराव बागल यांचा राजकीय वारस म्हणून राजकारणात वावरणाऱ्या रश्मी बागल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेने करमाळा विधानसभा मतदारसंघात रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघातले शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे.

शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसेना आमदार पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असंही नारायण पाटील यांनी म्हटले होते.

तर दुसरीकडे तिकिटाबाबत मी आशावादी नाही, तर मला खात्री आहे की उद्धव साहेब मलाच उमेदवारी देतील. शिवसैनिकांनी माझं जंगी स्वागत केलेलं ते माझ्या पाठीशी आहेत अशी प्रतिक्रिया रश्मी बागल यांनी दिली होती.

Updated : 2 Oct 2019 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top