मला देशाचं प्रतिनिधित्व करायचंय- फुटबॉल खेळाडू मनीषा
Max Woman | 12 Jun 2019 2:38 PM IST
X
X
१४ वर्षांची मनीषा विश्वकर्मा ८ वीत शिकते आणि ती एक उत्कृष्ट फूटबॉल खेळाडू आहे. उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरच्या बनकटीया गावची ही मनीषा मागील ३ वर्षांपासून मुलांच्या फूटबॉल संघात फूटबॉल खेळत आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर जुनिअर खेळाडू म्हणून उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं. तर पुढे या खेळात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची तिची इच्छा आहे. ती खलीदाबादच्या मुख्य स्टेडीअमला सराव करते.
खूप गर्वाने ती तिची काळ्या रंगाची जर्सी घालून फिरते; अन् आता तिचे स्वप्न आहे कि संघाच्या निळ्या रंगाची जर्सी मिळवणं तिचं ध्येय आहे. आधीपासूनच खेळामध्ये पुढे असणारी मनीषा म्हणते कि “माझे अभ्यासात अजिबात मन रमत नाही; माझे ध्येय मी निश्चित केले आहे आणि तेच मी पूर्ण करेन” सामाजिक दबाव, सुविधांचा अभाव आणि अश्या अनेक समस्यांचा सामना करत ही उत्तर प्रदेशातील ध्येयवादी मनीषा नक्कीच तिच्या चाहत्यांची मनीषा नक्कीच पूर्ण करेल.
Updated : 12 Jun 2019 2:38 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire