Home > रिपोर्ट > मला पदवीधर व्हायचंय

मला पदवीधर व्हायचंय

मला पदवीधर व्हायचंय
X

इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. याचा प्रत्यय यंदाच्या दहावीच्या परीक्षेत आला आहे. काळाचौकी येथील अहिल्या नाईट हायस्कूलमधून शिकत असलेल्या ५९ वर्षांच्या कमल शिंदे यांना या परीक्षेत ५० टक्के गुण मिळाले आहेत.

स्वत:चा व्यवसाय सांभाळून त्या रात्री अभ्यास करायच्या. शिक्षणाची आवड आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नव्हते. मला शिक्षण घ्यायचे होते आणि ते मी घेतले असे त्या सांगतात. त्यांना पुढे बारावी परीक्षा पास होऊन पदवीधर होण्याची इच्छा आहे.

Updated : 12 Jun 2019 8:28 AM GMT
Next Story
Share it
Top