Home > रिपोर्ट > “काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच होणार” - मंदा म्हात्रे

“काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच होणार” - मंदा म्हात्रे

“काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच होणार” - मंदा म्हात्रे
X

विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे मंदा म्हात्रे नाराज असल्याची चर्चा रंगात आली आहे.

काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच होणार असा ठाम विश्वास मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. भाजपमध्ये आल्या नंतर बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांसोबत विभागवार बैठकांना सुरुवातही केली होती. याचा फटका मंदा म्हात्रे यांना बसणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती.

मात्र, भाजपाने जाहीर केलेल्या यादीत बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांच्या नावाचा उल्लेख असल्यानं या मतदार संघातून गणेश नाईक यांचाच पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता गणेश नाईक काय भूमिका घेतात याकडेचं सर्वांचं लक्ष लागले आहे.

Updated : 2 Oct 2019 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top