Home > रिपोर्ट > मी सांगीतल्याने अमृता थांबत नाहीत देवेंद्र फडणवीसांनी केला पहिल्यांदाच गौप्यस्फोट

मी सांगीतल्याने अमृता थांबत नाहीत देवेंद्र फडणवीसांनी केला पहिल्यांदाच गौप्यस्फोट

मी सांगीतल्याने अमृता थांबत नाहीत देवेंद्र फडणवीसांनी केला पहिल्यांदाच गौप्यस्फोट
X

ग्लॅमरस आणि बोल्ड अमृता फडणवीस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय बनत आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची ग्लॅमरस बायको म्हणून अनेकदा त्या ट्रोल ही झाल्यायत. मात्र तरी सुद्धा त्यांनी आपला बोल्डपणा सोडला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या स्मारकावरून

अमृता फडणवीस यांच्या ट्वीट वरून वाद निर्माण झाल्यानंतर

पहिल्यांदाच मी सांगीतल्याने अमृता थांबत नाहीत असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

अमृता फडणवीस या वेगळी एन्टीटी आहेत. त्या मला विचारून ट्वीट करत नाहीत. आणि मी सांगीतल्याने थांबत नाहीत. असं ही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. अमृता फडणवीस हा त्यांचा निर्णय स्वतः घेतात आणि त्याची किंमतही त्यांनी अनेकदा चुकवलेली आहे. मला वाटतं की, जेवढ्या कालच्या थरावर त्यांच्यावर टीका केली गेली असेल, ट्रोल केलं गेलं असेल तितकं कदाचित कुणाला केलं गेलं नसेल. त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल काही म्हटलेलं नाही, त्या स्मारकासाठी झाडं तोडणार असा निर्णय झाला त्यावर त्यांनी म्हटलं की मेट्रोसाठी झाडं तोडायला विरोध करता तर तिथे झाडं कशी तोडता. स्मारकाला विरोध केलेला नाही. त्यांचे ट्वीट त्या स्वतः करतात. त्या स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. माझं मत असं आहे की त्यांनी एखादं ट्वीट करायचं असेल तर इतकं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना प्रत्युत्तर येईल. काही लोकं जाणीवपूर्वक खालच्या दर्जाला जाऊन कमेंट करतील. काही राजकीय पक्षांनीही केलेलं आहे खालच्या पातळीवर जाऊन टीका. गेले पाच वर्षे आम्ही हे सहनच केलं आहे. राजकीय जीवनात हे सहन करावंच लागतं.

असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहेत

Updated : 13 Dec 2019 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top