Home > रिपोर्ट > इंदिरा गांधींप्रमाणेच होऊ शकते माझी हत्या- अरविंद केजरीवाल

इंदिरा गांधींप्रमाणेच होऊ शकते माझी हत्या- अरविंद केजरीवाल

इंदिरा गांधींप्रमाणेच होऊ शकते माझी हत्या- अरविंद केजरीवाल
X

सध्या लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आले असून आपल्याला सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांकडून एकमेकांवरआरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळालं. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या जीवाची भीती व्यक्त केली आहे. ज्याप्रकारे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच सुरक्षारक्षकाने केली होती , त्याचप्रमाणे मलाही सुरक्षा देणारे पोलीस अधिकारीच माझी हत्या करु शकतात अशी भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. पंजाब केसरी या वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी ही भीती व्यक्त केली. 'माझ्या सुरक्षेसाठी देण्यात आलेले पोलीस अधिकारी हे नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार काम करतात. त्यामुळे ज्याप्रमाणे इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाने केली होतीच त्याप्रमाणे माझीही हत्या हे अधिकारी करू शकतात. माझ्या जीवन-मरणामध्ये केवळ दोन मिनिटांचे अंतर आहे.' असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

Updated : 18 May 2019 1:13 PM GMT
Next Story
Share it
Top