Home > रिपोर्ट > मैं महिलांओके सुरक्षा का चौकीदार हूँ – पंतप्रधान मोदी

मैं महिलांओके सुरक्षा का चौकीदार हूँ – पंतप्रधान मोदी

मैं महिलांओके सुरक्षा का चौकीदार हूँ – पंतप्रधान मोदी
X

मैं शौचालय का चौकीदार हूँ, महिलांओके सुरक्षा का चौकीदार हूँ, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यातील प्रचार सभेत बोलत होते. मात्र, पंतप्रधान असं बोलत असले तरी सत्तेत असलेल्या त्यांच्या नेतेमंडळींना आपल्या परिसरातील स्वच्छतागृहाकडं बघण्याचा साधा वेळही नाही. स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा करणारं हे सरकार फक्त एप्रिल फूल करत आलं आहे. अद्यापही काही भागात महिलांना सार्वजनिक शौचालयं मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेलं नाही. काही ठिकाणी शौचालयं असूनही त्याची सफाई होत नसल्याचं दिसतंय. तसेच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ही देशात गंभीर बनत चालला असून मोदी मोठ-मोठ्या घोषणा देत आहेत. पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले...

व्हीडिओ, सौजन्य - मॅक्समहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, मै महिलांओके सुरक्षा का चौकीदार हूँ मात्र बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृती उतरण्यात जमीन-आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतेच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक ट्वीट केलं होतं की जर तुम्ही सगळे जर चौकीदार असाल तर महिला ही असुरक्षितच आहे. यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर मॅक्समहाराष्ट्रने रेणुका शहाणे यांच्याशी खास बातचीत केली होती ... पाहा हा व्हिडिओ...

व्हीडिओ, सौजन्य - मॅक्समहाराष्ट्र

Updated : 1 April 2019 10:36 AM GMT
Next Story
Share it
Top