Home > रिपोर्ट > ‘ब्रेस्ट मिल्क बँक’आता औरंगाबाद मध्ये

‘ब्रेस्ट मिल्क बँक’आता औरंगाबाद मध्ये

‘ब्रेस्ट मिल्क बँक’आता औरंगाबाद मध्ये
X

मातेचे दूध बाळासाठी योग्य आहार असतो. अनेकदा मातेला दूधाची कमतरता असल्या कारणांने नवजात शिशूंना अडचण येते. त्यामुळे त्यांना न्यूमोनीयासारख्या रोगांना सामोरे जावं लागतं. यावर तोडगा म्हणून

(human milk bank in maharashtra)औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रूग्णालयात मराठवाड्यातील पहिली मातृदुग्धपेढी सुरू करण्यात येणार आहे.

नवजात शिशूचिकीत्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून मातृदूग्ध पेढीची सुरवात होत आहे. कमी दिवसाचे अत्यवस्थ शिशू, अत्यवस्थ माता, दूधाची कमतरता इत्यादी कारणांमुळे बाळांना दूधाची अडचण येते.

ज्या मातांना अतिरीक्त दूध स्त्रवते अशा मातांनी दान केलेले दूध ‘बेस्ट मिल्क’ पंपाच्या साहाय्याने मातृदूग्ध पेढीत संकलन केले जाईल. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने पाश्चराईज्ड केले जाईल. त्याच्या सुरक्षतेची खात्री झाल्यावरचं नवजात शिशूला दिले जाईल.

येत्या ३ महिन्यात मातृदुग्धपेढी सूरू होणार असून या प्रकल्पाला कॅनडा, मलेशीया या देशांसोबत ‘रोटरी क्लब’नेही मदत केली आहे.

Updated : 5 Oct 2019 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top