FightagainstCoronavirus: मी घरात मिसेस मुख्यमंत्र्याचं ऐकतो- उद्धव ठाकरे
X
सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन (#IndiaFightCorona) करण्यात आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) राज्यातील जनतेला घरात राहण्याचं आवाहन करत आहेत. आजही त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन राज्यातील जनतेशी संवाद साधला.
- उद्धव ठाकरे आपल्या घरातले बीग बॉस- तृप्ती देसाई
- कोरोना: संकट नव्हे संधी !
- Coronavirus :'त्या' कुटुंबातील 9 लोकांना कोरोना ची लागण
आज जनतेशी संवाद साधताना सुरुवातीलाच राज्यातील जनतेला गुढीपाढव्याच्या शुभेच्छा देत आपण कोरोना व्हायरस च्या (Corona Virus) विरोधातील लढाई जिंकू असा विश्वास दिला. कोरोनाग्रस्ताच्या लढाईत लढण्यासाठी आज सर्व कुटूंब एकत्र आली आहेत. कोणी पत्ते खेळत आहे. कोणी संगिताची वाद्य वाजवत आहे. कोणी वाचन करत आहे. या निमित्ताने आपण जे गमावलं होतं ते आपण कमावत आहोत.
घरातील Ac शक्यतो बंद ठेवा. घरात खिडक्या उघड्या ठेवा. अशा सूचना दिल्या. सध्या राज्यातील काही नेते घरात काय करतात? हे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही घरात काय करता असा प्रश्न विचारला असता, मी घरात मिसेस मुख्यमंत्र्याचं ऐकतो. असं मजेशीर उत्तर देत तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरच ऐका असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
जीवनावश्यक कामे सुरुच राहतील, भाजीपाला बंद होणार नाही, त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भाजी आणण्यासाठी एकट्यानेच जा, अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. शेती मालाची वाहतूक, शेतीची काम सुरू राहील. फक्त गरजेपुरते बंद ठेवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ज्यांचे तळहातावर पोट आहे. त्यांची सरकार काळजी घेणार. ज्या कंपन्या आहे. त्यांचे मालक मदतीसाठी पुढे येत आहे. सर्वांना विनंती आहे की, तुम्ही तुमच्या आस्थापना बंद केल्या आहे. त्यांचं वेतन कपात करू नका. अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू, प्राण्यांचे खाद्यपदार्थांचा साठा करु नका, रुग्णालये, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालूच राहतील. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वत:हून पुढे येत आहे. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.